तळेरेत NEMS स्मार्ट किड्स प्री- प्रायमरी स्कूलचे दिमाखदार उद्घाटन

Edited by: उमेश बुचडे
Published on: July 07, 2023 21:09 PM
views 271  views

कणकवली : कणकवली:सिंधुदुर्गात प्रचलित आदर्श एज्युकेशन सोसायटी संचलित नॅशनल इंग्लिश मिडीअम स्कूल नडगिवे खारेपाटण शी संलग्न असलेल्या तळेरे येथील NEMS  स्मार्ट किड्स प्री-प्रायमरी स्कूलचे उद्घाटन प्रख्यात बालनाट्य कलाकार फेम प्रवीणकुमार भारदे यांच्या हस्ते फीत कापून पार पडले.यावेळी सरपंच हनुमंत तळेकर,नॅशनल इंग्लिश मीडियम स्कूलचे अध्यक्ष  मनोज गुळेकर,माझी सरपंच चंद्रकांत तळेकर, संस्थेचे कार्याध्यक्ष रघुवीर राणे,उपस्थित होते.कार्यक्रमची सुरुवात दीपप्रज्वलन व सरस्वती पुजनाने झाली.यावेळी नॅशनल इंग्लिश मिडीयम स्कूल नडगिवे तील इयत्ता सातवी तील विद्यार्थिनीनी सरस्वती वंदना सादर केली.शाळेचे मुख्याध्यापक कौस्तुभ देसाई यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले तर नॅशनल इंग्लिश मिडीयम स्कूल नडगिवे तील मराठी विभाग प्रमुख तेजश्री भोकरे यांनी संस्थेची स्थापना व तिचा आता पर्यंतचा प्रवास या विषयीची माहिती दिली.

यावेळी प्रवीण कुमार भारदे यांनी बोलताना सांगितले की  तळेरे मध्ये प्ले स्कूल उभारणे हे शिवधनुष्य पेलण्यासारखे आहे. आणि तो प्रयत्न मनोज मुळेकर यांनी केला त्याबद्दल त्यांचे खूप खूप अभिनंदन  कारण मुंबईसारखं शिक्षण या शाळेमध्ये मिळणार आहे. तसेच अत्याधुनिक पद्धतीने हे  NEMS  स्मार्ट किड्स प्री- प्रायमरी स्कूल सुरू झाले आहे त्यामुळे तळेरे व आजूबाजूच्या गावातील मुलांनी याच या शाळेत शिक्षण घेऊन आपले भविष्य घडवावे असे सांगितले 

संस्थेचे अध्यक्ष मनोज गुळेकर यांनी बोलताना सांगितले की मी या शिक्षण संस्थेच्या माध्यमातून समाज हिताची कामे करत आहे. चांगले विद्यार्थी घडावेत हीच माझी इच्छा आहे आणि त्यासाठी मुलांचे पालकत्व  मी स्वीकारत आहे .आणि भविष्यात या मुलांना चांगले शिक्षण तर देणारच पण चांगला माणूस घडवण्यासाठी देखील मी प्रयत्न करणार असल्याचे गुळेकर यांनी बोलताना सांगितले.

उपस्थित विद्यार्थ्यांना छत्रीचे देखील वाटप करण्यात आले. यावेळी माझी सरपंच शशांक तळेकर,संचालक मोहन कावळे,अॅड.सागर तळेकर,राजेंद्र ब्रम्हदंडे तसेच परवेझ  पटेल व मुख्याध्यापक कौस्तुभ देसाई,संस्था समन्वयक पराग शंकरदास, तेजस जमदाडे,गजानन कदम, प्रणिल शेट्ये,

त्यांच्यासह बहुसंख्येने पालक शिक्षक व शिक्षककेतर कर्मचारी उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेतील विद्यार्थिनी महवीश मुल्ला आणि जोया पटेल यांनी केले.तर संपूर्ण कार्यक्रमाला संगीताची साथ संगीत विषय शिक्षक हेमंत तेली यांनी दिली.