कुडाळमध्ये उद्या भव्य नरकासुर स्पर्धा..!

Edited by: प्रसाद पाताडे
Published on: November 10, 2023 19:54 PM
views 196  views

कुडाळ : शिवसेना व भाजप पुरस्कृत पानबाजार मित्रमंडळ कुडाळ आयोजित भव्य नरकासुर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवार दि. 11 नोव्हेंबर रोजी रात्री 10.30 वा. गुलमोहर हॉटेल समोर कुडाळ येथे ही स्पर्धा होणार आहे.

प्रथम पारितोषिक 30 हजार रू., द्वितीय 20 हजार रू., तृतीय 10 हजार रू. व चषक आणि स्पर्धेत सहभागी स्पर्धेस संघास 2 हजार रूपये देण्यात येणार आहेत. नरकासुर 10 फूट पेक्षा जास्त उंच असावा. रात्री 11 वाजेपर्यंत आलेले नरकासुर स्पर्धेत ग्राह्य धरले जातील. परीक्षक व मंडळाचा निर्णय अंतिम राहील. नंतर हुज्जत घातलेली चालणार नाही. या स्पर्धेवेळी ढोल पथक, डिजे साऊंट सिस्टिम, पि.के. ग्रुपचा स्टेज शो, तसेच प्रेक्षकांसाठी दर अर्ध्या तासांनी लकी ड्रा ( स्मार्ट वॉच) विशेष आकर्षण असणार आहे. 9.30 ते 10.30 या वेळेस मोफत लकी ड्राॅ कूपन्स उपस्थित प्रेक्षकांसाठी वाटप करण्यात येणार आहेत. 11 वाजल्यापासून दर पंधरा मिनिटांनी प्रेक्षकांसाठी हाजीर तो वजीर या पद्धतीने लकी ड्रॉ काढण्यात येणार आहे. लकी ड्रॉ मधील विजेत्यांना स्मार्ट वॉच बक्षिस देण्यात येणार आहेत. नियम व अटी अधिक माहितीसाठी नागेश नेमळेकर मो.नं.9404164391 यांच्याशी संपर्क साधावा. यावेळी सर्वांनी उपस्थित राहावे असे आवाहन शिवसेना महिला तालुकाप्रमुख सौ. सिध्दी सिध्देश शिरसाट यांनी केले आहे.