भुईबावड्यात क्रीडा - सांस्कृतिक महोत्सवाचे शानदार उद्घाटन

उद्योजक सुनील नारकर यांच्या वाढदिवसानिमित्त केले होते आयोजन
Edited by: श्रीधर साळुंखे
Published on: April 10, 2023 14:04 PM
views 237  views

वैभववाडी : उद्योजक सुनील नारकर यांच्या वाढदिवसानिमित्त स्पर्शिका बिल्डर अँड डेव्हलपर्स व मयुरी इंटरप्राईजेस यांच्यावतीने आयोजित केलेल्या तीन दिवसीय क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवाचे रविवारी सायंकाळी मोठ्या दिमाखात उद्घाटन झाले. भुईबावडा गावचे सरपंच बाजीराव मोरे यांच्या हस्ते हा उद्घाटन सोहळा संपन्न झाला.     

उद्योजक सुनील नारकर यांचा वाढदिवस 11 एप्रिल रोजी आहे. या वाढदिवसानिमित्त भुईबावडा नारकरवाडी येथे क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. महोत्सवामध्ये  महिलांकरिता खेळ पैठणीचा कार्यक्रम, पुरुष गटाकरिता कबड्डी व बॉक्स आंडराआर्म क्रिकेट स्पर्धाचं आयोजन करण्यात आले होते. या महोत्सवाच रविवारी सायंकाळी सरपंच श्री मोरे यांनी श्रीफळ वाढवून उद्घाटन केले.

यावेळी गावचे पाटील बाबुराव पाटील, मांगवली गावचे माजी सरपंच राजेंद्र राणे, नगरसेवक रोहन रावराणे, मनोहर मोरे, तानाजी मोरे ,अरुण मोरे, बाळू मोरे, सदानंद मोरे, गजानन मोरे, बाळकृष्ण मोरे, अनिल देसाई, सुनील वारंगे, रामदास घुगरे, अनिल पावले, विश्वनाथ नारकर, रमेश मोरे, सदानंद मोरे, संतोष देसाई, संदीप परटवलकर, श्री हांडे, उद्योजक सुनील नारकर, सदानंद नारकर, मयुरी नारकर यासह नारकर कुटुंबीय उपस्थित होते.