
सावंतवाडी : राज ठाकरे यांच्या दौऱ्याने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील लोकांच्या मनात मनसेबद्दल आदर आणि कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण झाला आहे. त्यामुळे बऱ्याच लोकांचा मनसे पक्षात जोरदार पक्ष प्रवेश होत आहेत. मनसे पक्षातील सर्वाचे लाडके नेते माजी उपजिल्हाअध्यक्ष अॅड. अनिल केसरकर, आरोंदा ग्रामपंचायत सदस्य नरेश देऊलकर, सतीश आकेरकर, साहील तळकटकर, महेंद्र कांबळी, सिध्देश सावंत उपस्थित होते.
मनसे पक्षातील प्रवेशावेळी तळवणे आणि पंचक्रोशीतील विविध समस्यावर विचार विनिमय करून एकमताने आणि एकञ राहुन लवकरात लवकर प्रश्न सोडवू तसेच मनसे पक्ष मजबुत करू, असे आश्वासन सर्व मनसे कार्यकर्त्यांकडून प्रवेशावेळी देण्यात आले.
मनसे पक्षात प्रवेश करण्यासाठी लोक मोठ्या प्रमाणात आग्रही आहेत आणि आता पुढे पण मनसे पक्षात लोकांचे जोरदार पक्ष प्रवेश होणार आहेत. तळवणे गावातील पक्ष प्रवेशावेळी अजित पोळजी, नमेश गावडे, ललित परब, अक्षय गावडे, अमरेश गावडे, नितीन गावडे, गजानन परब, समीर पोळजी, मनीष वैज, सुरेश पोळजी, विकास पालव, सचिन पांगम, ओमकार तळवणेकर, हर्षद तळवणेकर, अर्जुन पोळजी, बाबू, गौरेश पालयेकर, सत्यजित गावडे, राजू आरोलकर, संतोष गोडकर, जनार्दन नाईक, सिद्धेश भगे, चिंतामणी(राजा) खोत, विकास साटेलकर, राहुल खरात,शुभम बोंद्रे, गुणाजी मुळीक, शुभम नार्वेकर, अमित पोळजी, भूषण गावडे, राकेश सातार्डेकर, यांनी मनसे पक्षात प्रवेश केला.