कुडाळात ८ सप्टेंबरला भव्य दहीहंडी सोहळा !

Edited by: प्रसाद पाताडे
Published on: September 05, 2023 21:06 PM
views 371  views

कुडाळ : भारतीय जनता पक्षाच्या वतीने व कुडाळ मालवण विधानसभा प्रभारी तथा माजी खासदार निलेश राणे आयोजित शुक्रवार ८ सप्टेंबर रोजी सायं. ५ वा. पासून भव्य दहीहंडी सोहळा होणार असून या दहीहंडीसाठी सिने अभिनेत्यांसह लाईव्ह संगीत असणार आहे असे भाजपचे ओरोस मंडळ अध्यक्ष दादा साईल यांनी कुडाळ येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगून यावेळी 'मेरी मिट्टी मेरा देश' अंतर्गत ग्रामीण भागातून येणाऱ्या नागरिकांकडून त्या त्या गावातील कलशात गोळा केली जाणार आहे. असेही त्यांनी सांगितले. तसेच आतापर्यंत २६ गोविंद पथकाने नोंदणी केली असून ज्या गोविंदा पथकांना नोंदणी करायची असेल त्यांनी उद्या बुधवार ६ सप्टेंबर पर्यंत ही नोंदणी करावी असे आवाहन केले आहे.

भारतीय जनता पक्षाच्या वतीने कुडाळ एमआयडीसी विश्रामगृह येथे ओरोस मंडल अध्यक्ष दादा साईल व कुडाळ मंडळ अध्यक्ष संजय वेंगुर्लेकर यांची संयुक्त पत्रकार परिषद झाली. यावेळी जिल्हा बँक संचालक प्रकाश मोर्ये, प्रदेश सदस्य बंड्या सावंत, युवा मोर्चा अध्यक्ष रुपेश कानडे, पप्प्या तवटे, रांगणा तुळसुली सरपंच नागेश आईर, कुडाळ नगरपंचायत भाजपा गटनेता विलास कुडाळकर, स्वीकृत नगरसेवक गणेश भोगटे, राकेश कांदे, राम बांदेलकर आदी उपस्थित होते.

यावेळी दादा साहिल यांनी सांगितले की कुडाळ येथील नवीन एसटी बस आगार येते होणाऱ्या दहीहंडी चे पहिले पारितोषिक ५ लाख ५५ हजार ५५५ एवढे असून या दहीहंडीसाठी मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गोविंदा पथक येणार आहेत ही दहीहंडी थरांची असणार आहे. आतापर्यंत २६ गोविंदा पथकांची झाली आहे असे सांगून या कार्यक्रमासाठी सिने अभिनेत्री प्राजक्ता माळी, मानसी नाईक, प्रसिद्ध विनोदी अभिनेता भाऊ कदम, अभिनेता देवदत्त नागे तसेच प्रसिद्ध बॉलीवूड गायक आणि संगीत दिग्दर्शक सचिन गुप्ता आणि त्यांचे सहकलाकार यांचा लाईव्ह संगीत शो होणार आहे. त्याचप्रमाणे प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेत्री रिवा अरोरा सुद्धा या दहीहंडीसाठी उपस्थित राहणार आहे. लेझर शो सुद्धा नागरिकांना पाहायला मिळणार आहे. या सिने अभिनेत्यांबरोबरच भाजपचे सर्व वरिष्ठ नेते या कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार आहेत असे त्यांनी सांगितले.

तसेच या दहीहंडी निमित्त 'मेरी मिट्टी मेरा देश' कार्यक्रमांतर्गत ग्रामीण भागातून येणाऱ्या नागरिकांनी आपल्या गावातील माती घेऊन यावी आणि ही माती या ठिकाणी ठेवलेल्या कलशामध्ये ओतावी असे आवाहन दादा साईल यांनी केले आहे.