
देवगड : शिरगाव रामनगर येथील पावणारी बांदेश्वर मंडळ आयोजित महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा खासदार नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्त शिरगाव रामनगर येथे भव्य डे नाईट क्रिकेट स्पर्धा पार पडल्या. या स्पर्धेचे उद्घाटन भाजपा जिल्हा सरचिटणीस संदीप साटम यांच्या हस्ते झाले.
यावेळी भाजप देवगड युवा मोर्चा अध्यक्ष अमित साटम, मिलिंद साटम, उपसरपंच संतोष फाटक, शिरगाव सह. सोसायटी व्हाईस चेअरमन विनायक साटम, माजी सरपंच महेश मेस्त्री, वसंत साटम, पांडू घाडी, विशाल मेस्त्री आकाश साटम, प्रवीण मेस्त्री, सागर साटम, अनिल घाडी, सम्राट साटम, निशांत मेस्त्री, निखिल घाडी, ओंकार घाडी, यश घाडी, मयुरेश मेस्त्री, रुपेश मेस्त्री, कृष्णा सावंत, संदेश मेस्त्री इत्यादी मान्यवर आणि क्रीडा रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या स्पर्धेत एकूण 24 संघाने सहभाग घेतला होता. प्रथम क्रमांक काळंबा स्पोर्ट्स कणकवली, द्वितीय क्रमांक ओसरगाव, तृतीय क्रमांक सुनील स्पोर्ट मसुरे, चतुर्थ क्रमांक जय बजरंग मळई देवगड आणि शिस्तबद्ध संघ जी.के.एम.अंबेखोल यांना रोख रक्कम आणि सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले.