
वैभववाडी : रिक्षा संघटना वैभववाडीच्या २०व्या वर्धापन दिनानिमित्त रोटरी क्लब ऑफ वैभववाडी आणि सिंधू रक्तमित्र प्रतिष्ठान वैभववाडी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित रक्तदान शिबिरात २१ जणांनी रक्तदान केले.या सामाजिक उपक्रमाला तालुक्यातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
या शिबिराचे उद्घाटन वैभववाडीचे पोलिस निरीक्षक मनोज सोनवलकर व नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्य प्रमोद रावराणे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी रोटरी क्लब ऑफ वैभववाडीचे अध्यक्ष सचिन रावराणे, संतोष टक्के, प्रशांत गुळेकर, मुकुंद रावराणे तसेच सिंधू रक्तमित्र प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजेश पडवळ, रुपेश वारंग, प्रशांत ढवण, तेजस साळुंखे, समाधान जठार, संदीप नारकर ,रिक्षा संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष सचिन तळेकर, तालुका अध्यक्ष राजेश सरवणकर, हरिश्चंद्र सावंत, रविंद्र भागन, अमित पाष्टे, संजय रासम, रमाकांत मोहिते, दत्ताराम रावराणे यांच्यासह मोठ्या संख्येने रिक्षाचालक उपस्थित होते.
या रक्तदान शिबिरात एकूण २१ रक्तदात्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत सामाजिक बांधिलकीची जाणीव करून दिली. वैभववाडी तालुक्यातील रिक्षा संघटनेने वर्धापन दिनानिमित्त सामाजिक उपक्रम राबवून समाजाप्रती आपली जबाबदारी अधोरेखित केली असल्याने तालुक्यातील विविध स्तरांतून त्यांचे कौतुक करण्यात येत आहे.शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी रिक्षा संघटनेचे व सिंधू रक्तमित्र प्रतिष्ठानचे पदाधिकारी यांनी विशेष परिश्रम घेतले.










