ग्रामसेवक शिवराज राठोड - प्रदिप नारकर यांना महाराष्ट्र शासनाचा राज्यस्तरीय आदर्श ग्रामसेवक पुरस्कार...!

Edited by: नागेश दुखंडे
Published on: September 28, 2023 10:52 AM
views 142  views

देवगड : महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक संघटनेने जिल्हयातील ग्रामपंचायतीमध्ये सर्वोत्कृष्ट कार्य करणा-या ग्रामसेवक - ग्रामविकास अधिकारी यांना आदर्श ग्रामसेवक - ग्रामविकास अधिकारी म्हणून सन्मानित करण्याची मागणी शासनाकडे केली होती. या मागणीची दखल घेत शासनाने महाराष्ट्र शासनाचा राज्यस्तरीय आदर्श ग्रामसेवक पुरस्कार देण्याबाबत शासनाने जाहिर केल्याने महाराष्ट्र शासनाचा सन 2020-21 व सन 2021-22 या वर्षाचे राज्यस्तरीय आदर्श ग्रामसेवक पुरस्कार पुरस्कार ग्रामसेवक किंजवडे शिवराज राठोड व फणसे, पडवणे ग्रामसेवक प्रदिप नारकर यांना जाहीर करण्यात आला आहे.

सदरचा पुस्कार हा ग्रामपंचायत क्षेत्रामध्ये उत्कृष्ट कार्य करणा-या ग्रामसेवक - ग्रामविकास अधिकारी यांना देण्यात येतो. किंजवडे ग्रामपंचायतीचा कारभार ग्रामसेवक म्हणून शिवराज राठोड यांनी स्वीकारल्यानंतर त्यांनी किंजवडे ग्रामपंचायत राष्ट्रीय स्तरावरती नेण्यासाठी अनेक पुरस्कार प्राप्त करुन ग्रामपंचायत आदर्श बनविण्याचा मानस ग्रामसेवक शिवराज राठोड यांनी सरपंच,उपसरपंच,सदस्य तसेच गावातील ग्रामस्थांच्या सहकार्यातून बाळगला आहे.

ग्रामसेवक शिवराज राठोड यांनी यापुर्वी देवगड तालुक्यामधील बापर्डे ग्रामपंचायतीमध्ये ग्रामसेवक म्हणून काम केले असून त्यांनी बापर्डे गाव हा स्मार्ट गाव बनून आज बापर्डे गावाची ओळख देशामध्ये निर्माण करुन दिली आहे. बापर्डे ग्रामपंचायतीला शासनाचे अनेक पुस्कार मिळाले असून यामुळे बापर्डे ग्रामपंचायतीला अतिरिक्त निधी देखील विकास कामांसाठी प्राप्त झाला आहे. विकास आणि प्रशासन याची सांगड असल्याने आज आदर्श ग्रामसेवक म्हणून त्यांचे नाव घेतले जात आहे. ग्रामसेवक प्रदिप नारकर यांनी यापुर्वी देवगड तालुक्यामधील दाभोळे ग्रामपंचायतीमध्ये ग्रामसेवक म्हणून काम केले असून त्यांनी दाभोळे ग्रामपंचायतीला शासनाचे अनेक पुस्कार मिळाले असून विकास आणि प्रशासन याची सांगड असल्याने आज आदर्श ग्रामसेवक म्हणून त्यांचे देखील नाव घेतले जात आहे.