दोडामार्गात ग्रामपंचायत निवडणुका लक्षवेधी व रंगतदार | 23 सरपंचपदांसाठी 69 उमेदवार रिंगणात | पिकूळेत सर्वाधिक 7 जणांचे निवडणूक धुमशान !

दोडामार्ग ग्रामपंचायत थेट सरपंच निवडणूक स्पेशल रिपोर्ट
Edited by: संदीप देसाई
Published on: December 12, 2022 13:35 PM
views 311  views

दोडामार्ग : दोडामार्ग तालुक्यात २३ ग्रामपंचायतीच्या थेट सरपंचपदाच्या निवडणुका होत असून सर्वाधिक चुरस पिकुळे गावात होत आहेत. तेथे ७ जण सरपंच पदाची निवडणूक लढवित असून तालुक्यात दोन नंबरला सर्वाधिक उमेदवार झरेबांबर-आंबेलीत निवडणूक रिंगणात उतरले आहेत. येथे  ६ जन निवडणूक लढवित आहेत. तर कोनाळ व कळणे या गावात प्रत्येकी ४ जण सरपंच पदासाठी  निवडणूक लढवित आहेत. उर्वरित ठिकाणी मात्र तिरंगी व दुरंगी लढती होणार आहेत. यावेळी थेट सरपंच निवडणूक होत असल्याने बडे दिग्गज गावावर आपले प्रस्त प्रस्थापित करण्यासाठी निवडणूक रिंगणात उतरले आहेत. यात कळणे मधून जिल्हा बँक संचालक गणपत देसाई, पिकुळे मध्ये शिवसेनेंचे तालुकाप्रमुख संजय गवस, माटणेमध्ये विकास सोसायटीचे चेअरमन चंद्र्कांत उर्फ अण्णा शिरोडकर, तर विद्यमान सरपंच परमे आनंद नाईक, वझरेचे लक्ष्मण गवस, उसपचे दिनेश नाईक, कोनाळचे पराशर सावंत, खोकरलचे देवेन्द्र शेटकर, मागील निवडणूकमध्ये मणेरी जिल्हा परिषद निवडणूक लढविणार्या् सुजल गवस आदींनी गावच्या प्रथम व सदस्य  पदासाठी निवडणूक रिंगणात उडी घेतली आहे. त्यामुळे यावेळेच्या ग्रामपंचायत निवडणुका अतिशय लक्षवेधी व रंगतदार होणार आहेत. 


दोडामार्ग तालुक्यात होत असलेल्या एकूण २८ पैकी केर-भेकुर्ली, मोर्ले व विर्डी या तीन ग्रामपंचायतच्या संपूर्ण निवडणूका बिनविरोध झाल्या. तर मणेरी येथे सरपंच पद बिनविरोध झाली असून  फुकेरी येथे एक आरक्षित सरपंच पद कुणीच उमेदवारी दाखल न केल्याने तेथील सरपंच पद निवडणूक होणार असल्याने आता दोडामार्ग तालुक्यात एकू २३ गावच्या सरपंच पदांचा रणसंग्राम गावोगावी रंगू लागला आहे. येत्या १८ डिसेंबर ला प्रत्यक्ष मतदान होत असल्याने या २३ जागांसाठी रिंगणात उतरलेले ६९ सरपंच पदाचे उमेदवार मतदार राजाचे उंबरठे झिजविण्यात व आपला अजेंठा त्यांच्या पर्यन्त पोहचवून निवडणूक जिंकण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत आहेत. सरपंच पदाच्या दुसर्यां दा थेट निवडणुका होत असल्याने या निवडणुकांना मोठे महत्व प्राप्त झाले असून आता आपला वार्ड आणि वाडी नव्हे तर सबंध गावांचे मन जिंकून मते मिळविणे हे काम सहज सोपे नसल्याने यावेळी सरपंच पदाचे उमेदवार रात्रं दिवस प्रचारात मग्न झाले असून आपले मित्र परिवार, सगे सोयरे, राजकीय मित्र, आणि पॅनल या माध्यमातून मतदार राजाला आपलेसे करण्यासाठी गावोगावचे उमेदवार शर्थीचे प्रयत्न करत आहेत. दरम्यान मणेरी गावाच्या सरपंच पदाची निवडणूक बिनविरोध झाली असली तरी अन्य सर्व सदस्य पदांसाठी निवडणूक होत आहे. तर अगदी याउलट घोटगेवाडी गावात सर्व सदस्य बिनविरोध झाले असून फक्त सरपंच एकाच पदासाठी सार्वत्रिक निवडणूक होत आहे. त्या पुढची गमंत म्हणजे फुकेरी येथे आरक्षित सरपंच पदासाठी पात्र उमेदवार असून त्याठिकाणी एकही उमेदवारी अर्ज दाखल न झाल्याने सरपंच पदाची निवडणूक असूनही मतदान होणार नाहीय. त्यामुळे यावेळी दुसर्यां दा होणार्या  ग्रामपंचायत पंचवार्षिक निवडणुकीत अनेक ट्विस्ट पाहायला मिळणार हे मात्र निच्छित आहे. 


बिनविरोध ग्रा.प. सरपंच 

केर-भेकुर्ली, मोर्ले व विर्डी व मणेरी 



ग्रामपंचायत निहाय निवडणूक रिंगणात असलेले सरपंच पदाचे उमेदवार पूढीलप्रमाणे


पिकुळे- 7 जण

विशाल वासुदेव नाईक,

वसंत कृष्णा गवस,

संजय कृष्णा गवस,

कैलास गणू गवस,

विनय वसंत गवस,

रामचंद्र बाबाजी गवस,

आप्पा वसंत गवस


झरेबांबर-आंबेली 6

यतेश श्रीकांत गोवेकर,

चंदन अंकुश नाईक,

गंगाराम यमु खरवत,

आनंद अंकुश तळणकर

नितीन नारायण गवस,

अनिल दत्ताराम शेटकर


कोनाळ- 4

अस्मिता अनिल गवस,

सुचित्रा सुरेश बांदेकर,

माया दयानंद लोंढे,

रिया राजन लोंढे,


कळणे- 4

अजित मनोहर गवस

गणपत दत्ताराम देसाई

शुभम विष्णू देसाई

संजय तुकाराम देसाई



परमे पणतूर्ली- 

राजेंद्र कृष्णा उसपकर

प्रथमेश गजानन देऊलकर, 

आनंद भिवा नाईक,


कोलझर-उगाडे-

 शुभलक्ष्मी विष्णू देसाई

अस्मिता हिरबा देसाई

सुजल सूर्यकांत गवस

तळकट -

रामदास राजाराम देसाई,

नीलकंठ तुकाराम सावंत,

सुरेंद्र संभाजी देसाई

सासोली-

मोहन नारायण पारकर,

गिरीश कृष्णा डीचोलकर,

बळीराम कृष्णा शेटये


तळेखोल- 

अनिशा कृष्णा गवस

वंदना आनंद सावंत

भागीर्थी रामकृष्ण गवस

मोरगाव- 

पांडुरंग मंगेश कदम

संतोष वसंत आहिर

लक्ष्मण नानु पाळयेकर


आयी-

अनंत शिवा शेटकर,

आनंद शिवाप्पा मुरगुडी

तुषार तुळशीदास नाईक


आडाळी-

गोविंद अर्जुन परब,

कमलाकर हरी सावंत,

पराग महादेव गावकर,


घोटगे-

शुभेच्छा सुहास दळवी

पूर्वा परेश धुरी,

भक्ती भरत दळवी


झोळंबे – 

पार्वती नारायण वेटे

विशाखा विश्वनाथ नाईक


घोटगेवाडी – 

श्रीनिवास मुकुंद शेटकर 

गजानन रामचंद्र वाडकर


आंबडगाव – 

सुभद्रा रामा मयेकर

स्नेहा सदाशिव गवस


मांगेली- 

सुप्रिया लाढू नाईक

सुनंदा अजित नाईक


उसप- 

सुभद्रा भगवान गवस, 

रुचिता प्रवीण गवस 


खोकरल- 

प्रमोद वासुदेव गवस

देवेंद्र रामकृष्ण शेटकर


वझरे- गिरोडे

सुरेश सदाशिव गवस

समीर लक्ष्मण म्हावसकर


कुंब्रल-

सुरेश बाबू ताटे,

जनार्दन बाबू गोरे,


माटणे-

चंद्रकांत जयराम शिरोडकर

महादेव दत्ताराम गवस


बोडदे-

दयानंद मोगरा नाईक,

हरिश्चंद्र गंगाराम नाईक,