पदवीधर निवडणूकीवर ग्रा.पं.कर्मचा-यांचा बहिष्कार कायम

Edited by: विनायक गांवस
Published on: June 22, 2024 08:43 AM
views 148  views

सावंतवाडी : तालुक्पातील ग्रा.पं.कर्मचा-यांवर वारंवार  अन्याय होत आहे. कर्मचार्‍यांवर जगणे कठीण झाले आहे. काही ग्रामसेवक चुकीचे मार्गदर्नन  करुन कर्मचार्‍यांवर अन्याय करत आहेत. पंचायत समितीच्या गट स्तरावरुन चुकीच्या निर्णयांना  समर्थन दिले जात आहे. त्यामुळे प्रशासनाचा निषेध म्हणून 26जून 2024  च्या पदवीधर निवङणूकीवर ग्रा.प.संघटनेने बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेण्यात आला‌. 

त्यामुळे पदवीधर ग्रा.पं.कर्मचारी मतदानाचा हक्क बजावणार नाहीत असा ठराव सर्वानुमते घेण्यात आला अशी माहीती तालुकाध्यक्ष हनुमान केदार यांनी दिली.