
सावंतवाडी : न्यू मॉडेल इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेजचा विद्यार्थी गोविंद बाबुराव गावडे शिवतांडव स्तोत्रावर सलग तबला वाजवून विश्वविक्रम करण्याचा प्रयत्न करणार आहे. हा भव्य कार्यक्रम सोमवार ११ ऑगस्ट २०२५ रोजी कोल्हापूर येथील शिक्षण महर्षी डॉ. बापूजी साळुंखे स्मृती भवन, श्री स्वामी विवेकानंद कॉलेज, ताराबाई पार्क येथे आयोजित करण्यात आला आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्यातील आंबोली येथील रहिवासी असलेल्या गोविंद गावडेच्या या कार्यक्रमाची सुरुवात सकाळी ८ वाजता होईल. तबला वादनाच्या या अनोख्या विश्वविक्रमासाठी त्याला आंतरराष्ट्रीय स्केटिंग प्रशिक्षक आणि ग्लोबल व आशिया पॅसिफिक बुक निरीक्षक प्रा. डॉ. महेश अभिमन्यू कदम यांचे मार्गदर्शन लाभले आहे. तसेच सायंकाळी ५.०० वाजता बक्षीस वितरण समारंभ होणार आहे. गावडे परिवार आणि मेनन अँड मेनन कामगार, कर्मचारी, स्टाफ यांनी सर्वांना या कार्यक्रमासाठी उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.
गोविंद गावडे हा विक्रम करण्यात यशस्वी झाल्यास त्याच्या नावावर विक्रम नोंदविला जाणार आहे. वयाच्या तिसऱ्या वर्षापासून तो तबला वादन करत आहे. याप्रसंगी उपस्थित रहाण्याचे आवाहन बाबुराव गोविंद गावडे,बाळकृष्ण गोविंद गावडे,चंद्रकात विठ्ठल गावडे, चंद्रकात महादेव गावडे, प्रकाश विठ्ठल गावडे, सविता बाबुराव गावडे,सुरेखा बाळकृष्ण गावडे, तुकाराम कृष्णा गावडे, बाळकृष्ण रामचंद्र गावडे, प्रकाश दत्ताराम गवस, प्रकाश नागेश राऊळ यांसह मेनन अँड मेनन कामगार, कर्मचारी, स्टाफ आणि गावडे परिवाराकडून करण्यात आलं आहे.