गोपीचंद पडळकरांच्या प्रतिक्षेत समाज बांधव ताटकळत..!

Edited by: प्रसाद पाताडे
Published on: October 17, 2023 14:40 PM
views 310  views

ओरोस : धनगर जागर यात्रेनिमित्त आमदार गोपीचंद पडळकर सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर येत आहेत, आमदार पडळकर यांचा ठीक सकाळी 11 वाजता  समाज बांधवांसोबत "लढा आरक्षणाचा लढा आत्म सन्मानाचा" यावर आमदार गोपीचंद पडळकर मार्गदर्शन करणार आहेत.

मात्र आमदार गोपीचंद पडळकर तब्बल चार उलटूनही अद्यापही सिंधुदुर्ग जिल्ह्यात दाखल न झाल्याने धनगर समाजबांधव उपाशीपोटी ताटकळत गोपीचंद पडळकर यांची वाट पाहत आहे. तर समाज बांधवांमध्येच आमदार गोपीचंद पडळकर यांच्याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.