नवदुर्गांना जल्लोषात निरोप !

Edited by: विनायक गावस
Published on: October 25, 2023 13:42 PM
views 219  views

सावंतवाडी : शहरातील सार्वजनिक नवरात्रौत्सव मंडळाच्या नवदुर्गांना मंगळवारी मोठ्या जल्लोषात निरोप देण्यात आला. या निमित्त निघालेल्या भव्य मिरवणूका व देखावे खास आकर्षण ठरले.


शहरातील सार्वजनिक नवरात्रौत्सव मंडळाच्या नवदुर्गांना मंगळवारी मोठ्या जल्लोषात निरोप देण्यात आला. ढोल ताशांचा गजर, फटाक्यांचा आतषबाजीसह पारंपरिक पद्धतीने दुर्गामातेच विसर्जन करण्यात आले. यावेळी शहरातून निघालेल्या भव्य मिरवणूका खास आकर्षण ठरल्या. भव्य पौराणिक देखावे विशेष आकर्षण ठरले.

बाजारपेठ नवरात्रोत्सव मित्रमंडळ, ॐकार नवरात्रोत्सव मित्रमंडळ, माठेवाडा नवरात्रोत्सव मित्रमंडळ, रासाई मंडळाच्या देवींना रात्री उशीरा मोती तलाव येथे भक्तिभावाने निरोप देण्यात आला. यावेळी शहरवासीयांनी मोठी गर्दी केली होती.