ग्राहकांसाठी खुशखबर | मनपसंद खरेदीसाठी बेळगावच्या बीएससी मॉलची २० टक्के डिस्काउंट ऑफर

Edited by: संदीप देसाई
Published on: August 04, 2023 20:00 PM
views 169  views

बेळगाव : आगामी श्रावण महिना आणि सणासुदीच्या हंगामासाठी आपल्या कपड्यांची खरेदी करू इच्छिणाऱ्या कोकणवासीयांसाठी आनंदाची बातमी आहे. बेळगाव शहरातील बीएससी टेक्सटाईल मॉलने रविवारपासून कपड्यांच्या खरेदीवर 10 + 10 टक्के अशी खास श्रावणमास ऑफर दिली आहे.

पहील्या रेल्वे गेटलगत, मिलेनियम गार्डनजवळ असलेल्या या भव्य बीएससी टेक्सटाईल मॉलचा गेल्यावर्षी जुलै मध्ये छानदार शुभारंभ झाला होता. बेळगाव हे खरं तर कपडे खरेदीसाठी सिंधुदुर्ग आणि कोकणवासियांच हक्काचं शॉपिंग केंद्र आहे. त्याच शहरात तब्बल चार मजल्यांवर पसरलेले एक लाख चौरस फूट शॉपिंग क्षेत्र असलेला बीएससी हा प्रशस्त मॉल आहे.

याच मॉलने ग्राहकांसाठी खास श्रावण मास ऑफर सुरू केली असून त्यांबाबत प्रसारमाध्यमांना माहिती देताना मॉलचे संचालक बी. यू. चंद्रशेकर म्हणाले की, वर्धापन दिनाच्या उत्सवाचा भाग म्हणून आणि आगामी शॉपिंग फेस्टिव्हलसाठी ग्राहकांना विशेष ऑफर म्हणून 20% सवलत दिली आहे. रविवार 6 ऑगस्टपासून ही ऑफर सुरू होणार असून BSC नियमितपणे 10% सवलत देते. या विशेष ऑफर कालावधीत 10% अतिरिक्त सवलत ग्राहकांना दिली जाणार आहे.

“ विशेष म्हणजे आम्ही ही सवलत ताज्या स्टॉकवर देणार आहोत, क्लिअरन्स सेल म्हणून नाही. ही ऑफर मॉलमधील साड्या, लेडीज वेअर, पुरूषांचे पोशाख, मुलांचे कपडे आणि घरातील सामानासह सर्व कपड्यांवर लागू असेल. ऑफर मर्यादित कालावधीसाठी असल्याने सिंधुदुर्ग व कोकणवासियांना मॉलला भेट देऊन या ऑफरचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे.   ग्राहकांच्या व्यापक व विविधांगी निवडीसाठी आमच्याकडे भरपूर फ्रेश व्हरायटी उपलब्ध असल्याची माहिती श्री. चंद्रशेखर यांनी दिली आहे.

तर यावेळी बोलताना संचालक बी.एस.मृणाल म्हणाले की, गर्दी टाळण्यासाठी ग्राहकांच्या सोयीसाठी शोरूम सकाळी 9.30 वाजल्यापासून सुरू ठेवण्यात येणार आहे. कोकण आणि गोव्यातील ग्राहकांचे आम्ही मनापासून आभार मानतो ज्यांनी आम्हाला मोठ्या प्रमाणात पसंदी दिली. म्हणूनच आम्ही त्यांना या ऑफरचाही लाभ घेण्याचे आणि आगामी सणांसाठी ऑफरसह खरेदी करण्याचे आवाहन करत असल्याचे मृणाल यांनी स्पष्ट केलंय.