१२ वी च्या परीक्षेसाठी दिव्यांग विद्यार्थ्यांना शुभेच्छा..!

Edited by: उमेश बुचडे
Published on: February 21, 2024 14:59 PM
views 192  views

कणकवली : बारावी बोर्ड परीक्षेसाठी कणकवली तालुक्यातून एकूण 37 विद्यार्थी प्रविष्ट झाले असून त्यापैकी २० विद्यार्थ्यांना ज्यादा वेळ वाढवून व लेखनिक ही सुविधा प्राप्त झाली असून कणकवली तालुक्यातील कणकवली कॉलेज, फोंडा हायस्कूल, कनेडी हायस्कूल व एस एम हायस्कूल या ४  केंद्रावर वरील विद्यार्थी परीक्षा देत आहेत.

बोर्ड परीक्षा चालू होण्यापूर्वी दिव्यांग  विद्यार्थ्यांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले तसेच त्यांना प्रोत्साहन पर शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी कणकवली तालुका गटशिक्षण अधिकारी श्री. किशोर गवस साहेब, कणकवली कॉलेजच्या चेअरमन श्रीमती साळुंखे मॅडम, कणकवली कॉलेजचे प्राचार्य श्री. महालिंगे सर, श्री. भिसे सर, श्री. जाधवर सर, एस एम हायस्कूल मुख्याध्यापक श्री. बोडके सर, श्रीम. तावडे मॅडम गट साधन केंद्र कणकवली येथील विशेष तज्ञ श्री. भाऊसाहेब कापसे, विशेष शिक्षक श्री. कमलेश कामतेकर, श्री. सचिन सर्पे , श्री. नितेश तेली उपस्थित होते.