'गोल्डन शॉवर' बहरला !

Edited by: विनायक गांवस
Published on: April 15, 2024 10:38 AM
views 118  views

सावंतवाडी : माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांचे वृक्षप्रेम व त्यासाठी त्यांनी घेतलेली मेहनत सर्वश्रुत आहे. त्यांच्या संकल्पनेतून साकारलेले हिंदु- हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे राज्यातील एकमेव सजीव स्मारक बहरलेल्या वृक्षाच्या माध्यमातून प्रेरणा देत आहे. २०१५ मध्ये तत्कालीन नगराध्यक्ष बबन साळगावकर यांच्या संकल्पनेतून सावंतवाडीतील जिमखाना मैदाना शेजारील चेंडूफळी येथील मैदानात 'सोनबहावा' या वृक्षांची लागवड करण्यात आली होती. साळगावकर यांनी याठिकाणी वृक्ष लागवड केली होती. आज हा

'सोनबहावा' अर्थात 'गोल्डन शॉवर' बहरला असून हे नयनमनोहर दृश्य डोळे दिपवून टाकत आहे. बाळासाहेब ठाकरे ज्ञानप्रबोधिनी समोरील मैदानाची हे 'गोल्डन शॉवर' शोभा वाढवीत असून हे नयनमनोहर दृश्य अनेकजण आपल्या कॅमेरात कैद करीत आहेत.