सन्मतीश पाटीलला सुवर्णपदक..!

Edited by: विनायक गावस
Published on: April 07, 2024 09:08 AM
views 246  views

सावंतवाडी : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा म्हापण खालचावाडा या प्रशालेचा विद्यार्थी सन्मतीश अमर पाटील याने 4 फेब्रुवारी 2024 रोजी घेण्यात आलेल्या STS परीक्षेत 200 पैकी तब्बल 186 गुण मिळवत सुवर्णपदक पटकावले. तर ब्रेन डेव्हलपमेंट स्कॉलरशिप परीक्षेमध्ये 94 टक्के गुण मिळवत राज्यस्तरीय गुणवत्ता यादीमध्ये रौप्य पदक मिळवले. शाळेचे मुख्याध्यापक अमर पांडुरंग पाटील आणि शाळा व्यवस्थापन समिती सदस्या सौ.अस्मिता पाटील यांचे  मौलिक मार्गदर्शन त्याला लाभले . त्याच्या या यशाबद्दल शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष नारायण परब शाळा व्यवस्थापन समिती उपाध्यक्षा देवयानी गोडे, शाळा व्यवस्थापन समिती पदाधिकारी,माता पालक संघ पदाधिकारी , शिक्षक पालक संघ पदाधिकारी शाळा क्षेत्रीय ग्रामस्थ या सर्वांनी त्याचे अभिनंदन केले. त्यांच्या या यशाबद्दल त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.