गोकुळ दुध संघाचे चेअरमन अरुणराव डोंगळे यांचा वैभव नाईकांनी केला सत्कार

Edited by: उमेश बुचडे
Published on: June 17, 2023 15:32 PM
views 84  views

कणकवली :  जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ अर्थात 'गोकुळ'च्या चेअरमनपदी ज्येष्ठ संचालक अरुणराव  डोंगळे यांची निवड झाल्यानंतर ते प्रथमच सिंधुदुर्ग जिल्ह्यात आले असता आमदार वैभव नाईक यांनी आपल्या निवासस्थानी त्यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करत शुभेच्छा दिल्या. यावेळी जिल्ह्यातील दुध उत्पादक शेतकऱ्यांचे प्रश्न  व जिल्ह्यातील दुध उत्पादनाबाबत दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली.