गोव्याचे पीडब्लूडी मंत्री निलेश काब्राल यांचा राजीनामा..!

Edited by:
Published on: November 19, 2023 12:32 PM
views 360  views

पणजी : गोव्याच्या राजकीय वर्तुळातून एक महत्वाची बातमी येतेय. गोव्याचे पीडब्लूडी मंत्री निलेश काब्राल यांनी राजीनामा दिलाय. काँग्रेसमधून भाजपात दाखल झालेले आलेक्स सिक्वेरा यांचा रविवारी संध्याकाळी ७ वाजता शपथविधी होणार आहे.


काँग्रेसमधून आठ जणांचा गट भाजपात दाखल झाला होता. त्यावेळी दिलेल्या आश्वासनाप्रमाणे आलेक्स सिक्वेरा यांना मंत्रीपद देण्याचे ठरले होते. ही आश्वासनपूर्ती करण्यासाठी निलेश काब्राल यांना मंत्रीपदाच्या राजीनाम्याची विनंती केली होती. ती विनंती मान्य करूनच त्यांनी राजीनामा दिला असं मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले.