कणकवलीत अवैध दारूवर पोलिसांची धडक कारवाई

छाप्यात 32 हजार 580 रुपयांची गोवा बनावटीची दारू जप्त
Edited by: जुईली पांगम
Published on: October 11, 2022 12:03 PM
views 675  views

कणकवली, उमेश बुचडे : कणकवली तालुक्यात फोंडाघाट इथं अवैध दारूवर पोलिसांनी धडक कारवाई केलीय. यात  32 हजार 580 रुपयांची गोवा बनावटीची दारू जप्त करण्यात आलीय. 

पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार टाकलेल्या छाप्यात तब्बल 32 हजार 580 रुपयांची गोवा बनावटीची दारू व 15 हजार रुपये किमतीचा पत्र्याचा स्टॉल असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. 10 ऑक्टोबरला ही कारवाई करण्यात आली. यासंदर्भात संशयित रामचंद्र उर्फ बाबू तांबे, रा. फोंडाघाट हवेलीनगर याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दारुसह मुद्देमाल जप्त 

या कारवाईत 1400 रु. रॉयल स्टॅग व्हिस्की 180 मिली मापाच्या 07 बाटल्या, 6,400 रु. मॅकडॉल नंबर 1 व्हिस्की 180 मिली मापाच्या 32 बाटल्या, 7,200 रु. हनी ब्लेंड प्युअर बँडी असे लेबल असलेल्या गोवा बनावटी दारुणे भरलेल्या कंपनी सिलिबंद असलेल्या 180 मिली मापाच्या 72 प्लास्टिकच्या बाटल्या, 6,100 रु. हायवड फाईन व्हिस्की 180 मिली मापाच्या 61 बाटल्या, 3,000 रु बॉब्स लेमन ओडका 180 मिली मापाच्या 30 बाटल्या, 6, 400 रु. रोमॅनो वोडका 180 मिली मापाच्या 32 बाटल्या, 780 रु.  गोल्डन आईस ब्लू फाईन व्हिस्की 180 मिली मापाच्या 13 बाटल्या, 1,300 रु. मेक डॉल नं. 1 रम 180 मिली मापाच्या 10 बाटल्या, 15,000 रु. एक पत्र्याचा स्टॉल असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. अधिक तपास फोंडाघाट दुरक्षेत्राचे हवालदार वंजारे करत आहेत.