कुडाळ : झाराप येथे राज्य उत्पादन शुल्क विभागाने गोवा बनवटीची दारू वाहतूक करणारा ट्रक पकडला. यामध्ये ६१ लाख २८ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
ख्रिसमस व नववर्षाच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राज्य उत्पादन शुल्क विभागाला मिळालेल्या गुप्त माहितीनुसार राज्य उत्पादन शुल्कच्या कुडाळ निरीक्षक यांनी झाराप मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर संशयित वाहनांची तपासणी करीत असताना ट्रक क्रमांक (डीडी-०१- एच ९९४१) याची तपासणी केली असता यामध्ये गोवा बनवतीची रॉयल सिलेक्ट डीलक्स विस्की, एव्हरग्रीश रिझर्व्ह विस्की याचे एकूण १ हजार २० बॉक्स सापडून आले यामध्ये दोघांना अटक करण्यात आली आहे. यामध्ये ओमप्रकाश गुप्ता (नवी मुंबई) शिवलखन केवट (मध्यप्रदेश) यांचा समावेश आहे या कारवाईमध्ये गोवा बनवतीची दारू व ट्रक मिळून ६१ लाख २८ हजार एवढा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.