
सावंतवाडी : गोवा राज्यातील नामांकित म्हणून ओळखली जाणारी आणि दर्जेदार आयोजनासाठी प्रसिद्ध असलेली पेडणे तालुक्यातील ध्रुव स्पोर्ट्स अँड कल्चरल क्लबच्या क्रिकेट स्पर्धेत सलग ७ वर्षे समालोचन करणारे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बांदा येथील जय भोसले आणि शिरोडा येथील अशोक नाईक यांचा विशेष सन्मान करण्यात आला.
या स्पोर्ट्स क्लबच्या वतीने दरवर्षी पेडणे प्रीमियर लीग तर दर दोन वर्षांनी ध्रुव ट्रॉफी क्रिकेट स्पर्धेचे तसेच महिलांच्या क्रिकेट स्पर्धेचे आयोजन सतत केले जात आहे.पेडणे प्रीमियर लीगचे हे सातवे वर्ष होते.यंदा १६ संघांची सहभाग असलेली ही क्रिकेट स्पर्धा तब्बल ६ दिवस चालली.या स्पर्धेत जय भोसले आणि अशोक नाईक यांनी केलेल्या समालोचनाने क्रीडा रसिक मंत्रमुग्ध झाले.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी समालोचकांचे कौतुक केले.पुढच्या वर्षी होणारी ध्रुव ट्रॉफीत आठ राज्यातील संघांना आमंत्रण देण्यात आले आहे