
बांदा : बोकड व पैशाच्या अमिषाला लागून बांदा भाजपाचा युवा वर्ग जर महायुती सोडून आजूबाजूला गेला असेल तर त्यांना परत बोलवा. काही जणांनी त्यांना बोकड वैगरे मटण घातल असेल तर त्यांना बोकड परत देऊन टाकू कारण मी अनेक शेतकऱ्यांना छोटी छोटी बोकड दिली होती. ती आता मोठी झली असतील ज्यांनी बोकडाचे मटण घेतलं असेल त्यांना बोकड परत देऊन टाकु असं अपक्ष उमेदवार विशाल परब यांच नाव न घेता महायुतीचे उमेदवार दीपक केसकर यांनी त्यांना टोला लगावला आहे.
बांदा येथे महायुतीचे उमेदवार दीपक केसकर यांची आज शुक्रवारी प्रचारार्थ सभा स्वामी समर्थ हॉल इथं आयोजित केली होती. त्यावेळी दीपक केसकर बोलत होते. यावेळी त्यांच्या सोबत बांदा सरपंच प्रियांका नाईक, भाजप महिला जिल्हाध्यक्ष श्वेता कोरगावकर, प्रमोद कामत, शिवसेना जिल्हाध्यक्ष अशोक दळवी ,सावंतवाडी संस्थाचे युवराज लखमराजे भोसले, बाळा गावडे, उपसरपंच राजाराम सावंत, दादू कविटकर भाजप, शिवसेना महायुतीचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संखेने उवस्थित होते.
यावेळी दीपक केसकर म्हणाले की महायुती सरकारच्या माध्यमातून बांदा शहरात सुसज्ज मच्छीमार्केट इमारत, रस्ते, गटार, पाणी तसेच शेर्ले येथे जाणारा तेरेखोल नदीवरील पूल कित्तेक वर्षची मागणी असणारा पूल आज मी पूर्ण केला आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात बांद्याचा कायापालट निश्चित करणार आहे. हा माझा शब्द आहे. त्यामुळे धनुष्य बाण चिन्हा समोरील बटन दाबून मतदान करा असे आवाहन यावेळी दीपक केसकर यांनी केले.