
सिंधुदुर्गनगरी : कणकवली तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष भगवान लोके व नुतन कार्यकारिणीचा पालकमंत्री नितेश राणे यांनी पुष्पगुच्छ देवून सत्कार केला. पत्रकार संघ म्हणून आगामी काळात चांगले काम करा, अशा शुभेच्छा व्यक्त केल्या. तसेच कणकवली पत्रकार संघाने प्रेस क्लबसाठी प्रस्ताव दिल्यास ते काम मार्गी लावले जाईल, असा विश्वास या भेटीदरम्यान पालकमंत्री नितेश राणे यांनी व्यक्त केला.
यावेळी मराठी पत्रकार परिषदेचे प्रतिनिधी गणेश जेठे, जिल्हा उपाध्यक्ष संतोष राऊळ, सचिव संजय सावंत, खजिनदार रोशन तांबे, माजी तालुकाध्यक्ष चंद्रशेखर देसाई, अजित सावंत, उपाध्यक्ष उमेश बुचडे, विरेंद्र चिंदरकर, तुषार हजारे, संजय बाणे, विजय गांवकर आदींसह पत्रकार उपस्थित होते.