किरण सामंतांना तातडीने पोलीस प्रोटेक्शन द्या | आ. वैभव नाईक यांची मागणी

Edited by: भरत केसरकर
Published on: May 07, 2024 07:56 AM
views 1389  views

कुडाळ : किरण सामंत हे आज सकाळपासून नॉट रिचेबल असल्याच्या बातम्या प्रसार माध्यमांवर आल्या आहेत. कोकणात झालेल्या या आधीच्या निवडणुकांमध्ये दहशतवादी प्रवृत्तीने कायम डोके वर काढले आहे. आणि दहशतवादी प्रवृत्ती आज निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यांना समोर पराभव दिसू लागल्याने त्या कोणत्याही थराला जाऊ शकतात असं वैभव नाईक यांनी सांगत किरण सामंत यांना तातडीने पोलीस प्रोटेक्शन देण्यात यावे. अशी मागणी कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी केली आहे.