
सावंतवाडी : कारिवडे येथील परमपूज्य आप्पासाहेब पटवर्धन माध्यमिक विद्यालयाला लॅपटॉप व प्रिंटर भेट वैभववाडी येथील रोटरी क्लबच्या वतीने प्रा. नामदेव गवळी यांच्या सहकार्याने देण्यात आला आहे. सदर प्रिंटर व लॅपटॉप शाळेकडे सुपूर्त करण्यात आला आहे ही शाळा अनेक समस्या व अडचणीवर मात करत विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देत आहे 40 टक्के अनुदानावर ही शाळा कार्यरत आहे या शाळेत सर्वसामान्य गोरगरीब विद्यार्थी शिक्षण घेत आहेत त्यांना चांगले सर्व सुविधायुक्त शिक्षण मिळावे, यासाठी या गावचे रहिवासी आणि साहित्यिक वैभववाडी येथील आनंदीबाई रावराणे वाणिज्य महाविद्यालयाचे प्राचार्य नामदेव गवळी यांनी पुढाकार घेऊन वैभववाडी येथील रोटरी क्लबच्या माध्यमातून या शाळेला लॅपटॉप व प्रिंटर भेट दिला आहे.
यावेळी रोटरी क्लबचे अध्यक्ष संतोष टक्के सचिव संजय रावराणे, सदस्य मुकुंद रावराणे, सचिन रावराणे प्रा. नामदेव गवळी, महेंद्र गवळी, शाळेचे प्रभारी मुख्याध्यापक देऊ साईल, ज्येष्ठ शिक्षिका अर्चना सावंत, एकनाथ जाधव, प्रभाकर उदार, विष्णू परब, श्रीमती जाधव आदी उपस्थित होते.
यावेळी रोटरी क्लबचे अध्यक्ष संतोष टक्के म्हणाले कारिवडे गाव अत्यंत सुंदर आहे. या गावात अनेक रत्न निर्माण झाले आहेत. या गावातील प्रा. नामदेव गवळी हे लेखक कवी साहित्यिक आहेत तसेच महेंद्र गवळी यांनी दशावतार कलेला एक वेगळा लुक प्राप्त करून दिला आहे. अशा या गावातील शाळा एक आदर्शवत आणि सर्व सुविधायुक्त असायला हवी अशी भावना प्राध्यापक नामदेव गवळी यांनी आमच्याकडे व्यक्त केली. आपल्या गावातील मुले दर्जेदार शिक्षण घेऊन उच्च पदापर्यंत जावीत या सामाजिक भावनेतून रोटरी क्लबने या शाळेला लॅपटॉप आणि प्रिंटर भेट दिला आहे.
प्राध्यापक तथा साहित्यिक कवी नामदेव गवळी म्हणाले मी या गावात शिकलो आणि मोठा झालो या गावाने मला खूप काही दिले आहे या गावाचे ऋण मी कधीही विसरणार नाही माझ्या गावातील शाळा आणि गावचा विकास आणि येथील मुले शैक्षणिक दृष्ट्या प्रगत व्हावी यासाठी हे हायस्कूल गेली वीस वर्षहुन अधिक काळ कार्यरत आहे. या शाळेतील शिक्षक कर्मचारी विनाअनुदान तत्त्वावर विद्यार्थ्यांना शिक्षणाचे दान देत आहेत. या शाळेतून आतापर्यंत अनेक विद्यार्थी घडले आहेत. यापुढे या शाळेतून एक दर्जेदार आणि उत्तम शिक्षण विद्यार्थ्यांना मिळावे यासाठी सर्वतोपरी मदत केली जाईल, असे ते म्हणाले.
यावेळी सचिव संजय रावराणे यानीही आपले मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक ज्येष्ठ शिक्षिका अर्चना सावंत केले. सूत्रसंचालन श्री उदार तर आभार जाधव यांनी मानले.