शिवसेनेकडून अंकुर निवारा केंद्रातील महिलांसाठी इलेक्ट्रीक गिझर भेट

Edited by: विनायक गावस
Published on: July 18, 2023 13:24 PM
views 133  views

सावंतवाडी : महाराष्ट्र राज्याचे शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री तथा कोल्हापुर जिल्हा व मुंबई शहरचे पालकमंत्री दीपक केसरकर यांचा ६८ वा वाढदिवस आज मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. वाढदिवसाच्या निमित्ताने शिवसेना पदाधिकारी व दीपकभाई मित्रमंडळाच्यावतीने विविध सामाजिक, शैक्षणिक व आरोग्य विषयक उपक्रमांचे आयोजन करण्यात आलं आहे. यानिमित्ताने सावंतवाडी शहरातील अंकुर निवारा केंद्र येथील महिलांसाठी इलेक्ट्रीक गिझर भेट देण्यात आला. 


याप्रसंगी माजी नगराध्यक्ष अनारोजिन लोबो, शहरप्रमुख खेमराज उर्फ बाबू कुडतरकर, नगरसेवक सुरेंद्र बांदेकर, भारती मोरे आदी आदी उपस्थित होते.