
दोडामार्ग : श्री देवी सातेरी धारेश्वर देवस्थानच्या हरिनाम सप्ताहानिमित्त घोटगे ग्रामस्थ आयोजित दिनांक २३ नोव्हेंबर रोजी भव्य दिव्य असे भजन स्पर्धेचे आयोजन केले आहे. गेली १९ वर्ष ही भजन स्पर्धा चालू आहे अनेक भजनी बुवा आपल्या सुमधुर स्वरातून मंत्रमुग्ध करून टाकतात त्यामुळेच कार्तिकी एकादशीला संपूर्ण परिसर भक्तीसागरात तल्लीन होत असतो या वर्षीच्या स्पर्धेसाठी प्रथम पारितोषिक ७००० रुपये श्री. शिवराम लक्ष्मण दळवी द्वितीय पारितोषिक ५००० रुपये श्री.बाळा अर्जुन दळवी तृतीय पारितोषिक ३००० रुपये सोनू मोहन दळवी उत्तेजनार्थ पारितोषिक श्री.संदीप भिकाजी दळवी तर उत्कृष्ट हार्मोनियम वादक १००० रुपये श्री.साईश विजय दळवी उत्कृष्ट तबला वादक १००० रुपये श्री. विनय भगवान दळवी उत्कृष्ट गायक १००० रुपये श्री.जनार्दन गणेश सुतार शिस्तबद्ध संघ १००० रुपये श्री.सुधीर आबा दळवी यांच्या कडून पुरस्कृत करण्यात आली आहे.
तर सर्व स्पर्धकांना अल्पोपहाराची व्यवस्था प्रियांका शंकर दळवी व सेजल शंकर दळवी यांनी केली आहे. स्पर्धेच्या नियमावली साठी किंवा इतर माहिती साठी संदीप दळवी ९४२१२६५२४२ जनार्दन सुतार ९४२०२६२५२९ गोसावी सर ९१६८३२१३१४ यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन घोटगे ग्रामस्थांनी केले आहे.