घोटगे-परमे पूल चार दिवसांपासून पाण्याखाली

नागरिकांची कसरत
Edited by: संदीप देसाई
Published on: July 25, 2023 20:05 PM
views 153  views

दोडामार्ग : दोडामार्ग तालुक्यात तीलारी धराणातून तिलारी नदीत पाण्याचा विसर्ग सुरू झाल्यापासून गेले चार दिवस घोटगे परमे पूल पाण्याखाली आहेच. त्यामुळे दोन्ही गावांचा संपर्क तुटला असून शाळकरी मुले आणि ग्रामस्थांना गाव, शाळा, कॉलेज, बाजार गाठताना मोठी तारेवरची कसरत करावी लागत आहे.

  तिलारी नदीवरील  घोटगे परमे पुलावर चौथा दिवशी ही पाणी असल्याने या दोन्ही गावातील वाहतून बंद झाली आहे. पर्यायाने तिलारी कलव्याचा  आधार घेत लांब पल्ल्याचा प्रवास करावा लागतं आहे. साटेली भेडशी दोडामार्ग तसेच अन्य ठिकाणी शिक्षणासाठी जाणाऱ्या मुलांची मोठी गैरसोय झालेली आहे.


आज मंगळवारी साटेली येथील रास्तदाराचे धान्य दुकानात परमे गानातील पुरवठा धारक रेशनकार्ड धरकाना धान्य वितरण केले जाणार असल्याने येथील महिला जाण्यासाठी निघाल्या मात्र पुलावर पाणी असल्याने त्यांना नाविलाजास्तव माघारी घरी परतावे लागले. आज जर धान्य आणले नसेल तर या महिन्याचे धान्य मिळणार की नाही त्यामुळे परमे गावच्या ग्रामस्थात एक प्रकारे भीतीचे वातावरण पसरले असून दोडामार्ग तहसीलदार यांनी येथील रेशनकार्ड धारकाना धान्य उपलब्ध करून द्यावे अशी मागणी येथील महिलांनी केली आहे.



पावसाळ्यांत तिलारी नदीला मोठ्या प्रमाणात पाणी असते त्यातच तिलारी धरणातील अतिरिक्त पाणी याचं नदी पात्रातून सोडले जाते त्यामुळे या नदीपात्रातील पाण्याची पातळी वाढते या पाण्याचा अंदाज घेऊन पूल बांधण्यात यावे अशी त्यावेळी मागणी केली होती मात्र संबंधीत अधिकारी यांनी या मागणी कडे गांभीर्याने लक्ष नदेता त्यावेळी त्यावेळी पुलाचे बांधकाम करण्यात आले नसल्याने हे पूल बांधून सुद्धा ग्रामस्थाना पूर्वी प्रमाणेच पावासाळ्यांत अनेक अडचणींना सामाना करावा लागतं असल्याने येथील महिलांना णी नाराजी व्यक्त केली आहे.