
कणकवली : घोणसरी ग्रामपंचायतच्या पंचवार्षिक नवडणुकीत गावातील सुज्ञ मतदारांनी कार्यसम्राट आमदार नितेशजी राणे यांच्या नेतृत्वार विश्वास टाकत भारतीय जनता पार्टी पुरस्कृत श्री गांगोलिंग माऊली ग्रामविकास पॅनलचे सरपंच पदाचे उमेदवार श्री मॅक्सी पिंटो आणि ६ सदस्य भरघोस मतांनी निवडून दिले.त्यांना आज मावळत्या सरपंच सौ मृणाल पारकर यांनी शाल श्रीफळ पुष्गुच्छ देऊन पदभार दिला. तसेच उपसरपंच पदासाठी भारतीय जनता पार्टी कडून एकमेव सौ.दिप्ती दिवाकर कारेकर यांचा अर्ज दाखल झाल्याने निवडणूक निर्णय अधिकारी श्री.कांबळे यांनी त्यांची बिनविरोध निवड जाहीर केली.
नवनिर्वाचित सरपंच श्री.मॅक्सी पिंटो उपसरपंच सौ.दिप्ती कारेकर,नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य अंकिता परब,सतीश जाधव,प्रसाद राणे,प्राची राणे,सुप्रिया आचरेकर,महेश येंडे,सचिन सुतार,ऐश्वर्या सावंत यांचा भाजपा जिल्हा सरचिटणीस श्री.मनोज रावराणे यांनी शाल श्रीफळ पुष्गुच्छ देऊन त्यांचे अभिनंदन केले.
यावेळी मावळत्या सरपंच सौ मृणाल पारकर, मावळते उपसरपंच श्री. विलास मराठे,दूध सोसायटी चेअरमन गणेश परब,सोसायटी संचालक विश्वजित राणे,महाराणा मित्रमंडळाचे अध्यक्ष विजयराव राणे,भाजपा बूथ अध्यक्ष संजय शिंदे,बाबू राणे,माजी सरपंच दिपक एकावडे, भाजपा तालुका सोशल मीडिया सदस्य नितीन पारकर, भाजपा ओबीसी सेल शक्तीकेंद्र प्रमुख दत्ताराम गुरव,रवींद्र सावंत,मिलिंद मराठे,विजय एकावडे,समीर राणे,दिलीप राणे, दिगंबर सावंत,जाधव गुरुजी,कृष्णा शिंदे,अनिल राणे,दिपक मराठे,विठ्ठल बागवे,एकनाथ परब,प्रमोद राणे, अनंत गुरव, आर के घाडी,दिपक शिंदे,रवींद्र एकावडे,विलास साळसकर, रॉबर्ट रईस,विजय रासम,चंद्रकांत जाधव,मिहिर मराठे,दिवाकर कारेकर आदि भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.