
कणकवली : घोणसरी गावचे विद्यमान सरपंच मॅक्सी पेद्रू पिंटो, वय 62 यांचे प्रदीर्घ आजारात, औषधोपचार दरम्यान कणकवली येथे बुधवार रात्रि अकरा वाजता दुःखद निधन झाले. त्यांचे पार्थिव गुरुवारी सकाळी 11 वाजता घोणसरी येथे अंत्यदर्शनासाठी आणण्यात आले. सायंकाळी त्यांचे वर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी त्यांचा असंख्य मित्रपरिवार, स्थानिक नेते आणि पंचक्रोशीतील ग्रामस्थ उपस्थित होते.
लोकाभिमुख नेतृत्व,संघर्षातून लोकांचे भविष्य निर्माण करणारा स्थानिक कार्यकर्ता, देवघर मध्यम पाटबंधारे प्रकल्पग्रस्तांसाठी आणि पुनर्वसनासाठी अध्यक्षपदावरून सर्वसामान्यांच्या प्रश्नासाठी प्रसंगी प्रशासनाशी झगडणारा मित्र, प्रेमळ जनसंपर्क, मदतीला धावून जाणारा आणि गावच्या विकासाचा अभ्यासपूर्ण ध्यास असलेला नागरिक म्हणून मॅक्सी हे, घोणसरीत,प्रशासन, पंचक्रोशी आणि ग्रामस्थांमध्ये प्रिय होते. त्यांच्या निधनाबद्दल दशक्रोशीत शोक व्यक्त होत आहे.