
सावंतवाडी : खरीप हंगाम सन 2025-26अंतर्गत क्रॉपसॅप संलग्न भात पीक शेतकरी शेती शाळेच्या पहिल्या वर्गाचे घारपी या गावात आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला प्रभारी मंडळ कृषी अधिकारी बांदा एस.ए.सरगुरु, कृषी पर्यवेक्षक श्रीमती छाया राऊळ, कृषी सहाय्यक मिलिंद निकम आदी उपस्थित होते.
कार्यक्रमामध्ये आय.सी.एम.टाळी, प्रतिज्ञा, खरीप हंगाम नियोजन भात लागवड पद्धती, हळद लागवड, नाचणी, वरी लागवड, फळबाग लागवड, शेततळ्यामधील मत्स्य उत्पादन खेकडा पालन, आंबा फळमाशी ट्रॅपचा वापर, सेंद्रिय शेती इत्यादी विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले. तसेच शेतकऱ्यांनी विचारलेल्या समस्यांचे निराकरण करण्यात आले. यावेळी घारपी गावातील शेतकऱ्यांना शेतकरी मासिकचे वाटप करण्यात आले.