
सावंतवाडी : आजच आंदोलन हे झोपेच सोंग घेतलेल्या लोकांना जाग आणण्यासाठी आहे. सावंतवाडी टर्मिनसच भुमिपूजन होऊन ५० टक्के काम पूर्ण झाल. मात्र, उर्वरीत काम अडविण्यासाठी काहीजण पुढाकार घेत आहेत. हे झारीतले शुक्राचार्य कोण आहेत ? ते शोधून काढून जनतेन त्यांचा बंदोबस्त करावा. त्याचवेळी रेल्वे टर्मिनसच काम पूर्णत्वास येईल असं विधान कोकण रेल्वे प्रवासी संघटनेचे अध्यक्ष अँड. संदीप निंबाळकर यांनी व्यक्त केले. सावंतवाडी रेल्वे स्थानकावर स्वातंत्र्य दिनी 'घंटानाद' आंदोलन करण्यात आले. याप्रसंगी ते बोलत होते.
अँड. निंबाळकर म्हणाले, २६ जानेवारीला काही लोकप्रतिनिधींनी रेल्वे मंत्र्यांशी भेट करुन देतो असं आश्वासन दिलं होतं. मात्र, ती भेट करून दिली नाही. त्यावेळचे प्रश्न देखील तसेच प्रलंबित आहेत. राज्य सरकारकडून रेल्वेला आवश्यक गोष्टी पुरवण्याच काम सुरू झालं आहे. तिलारीतून येथे येणाऱ्या पाण्यासाठी साडेपाच कोटीची मंजूरी देण्यात आली आहे. सावंतवाडी रेल्वे टर्मिनसच्या काही अडचणी राज्य सरकार दुर करताना दिसत आहे. त्यामुळे पुढील भुमिका केंद्र सरकार, स्थानिक खासदार व इतर लोकप्रतिनिधींनी घ्यायची आहे. मात्र, ती भुमिका घेताना ते दिसत नाही. आजच आंदोलन हे त्यांना जाग आणण्यासाठी, झोपेच सोंग घेतलेल्यांसाठी आहे. सावंतवाडी टर्मिनसच भुमिपूजन होऊन ५० टक्के काम पूर्ण झाल. मात्र, उर्वरीत ५० टक्के काम अडविण्यासाठी काहीजण पुढाकार घेत आहेत. हे झारीतले शुक्राचार्य कोण आहेत ? ते शोधून काढून जनतेन त्यांचा बंदोबस्त करावा. त्याचवेळी रेल्वे टर्मिनसच काम पूर्णत्वास येईल असं मत कोकण रेल्वे प्रवासी संघटनेचे अध्यक्ष अँड. संदीप निंबाळकर यांनी व्यक्त केले.
कोकण रेल्वेन आम्हाला बेलापूरला बोलावल होत. मात्र, अल्प काळात हे कळल्यान जाण शक्य झालं नाही. कोकण रेल्वे व व्यवस्थापकांसह आमच्या लोकप्रतिनिधींनी बैठक लावावी, ती आवश्यक आहे. आमच्या स्थानकच उत्पन्न खूप चांगल आहे. असं असतानाही सावंतवाडी टर्मिनसकडे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे कोकण रेल्वेसोबत बैठक घेऊन आमच्या मागण्या त्यांच्यासमोर ठेवाव्यात. यासाठी आमदार व खासदारांनी पुढाकार घ्यावा अशी मागणी सचिव मिहीर मठकर यांनी केली. काढून घेतलेले थांबे, नवे थांबे रेल्वे गाड्यांना द्यावे तसेच प्रा. मधू दंडवतेंच नाव सावंतवाडी टर्मिनसला द्यावे अशी विनंती केली.
कोकण रेल्वेन आम्हाला बेलापूरला बोलावल होत. मात्र, अल्प काळात हे निमंत्रण मिळाल्याने तेथे जाण शक्य झालं नाही. कोकण रेल्वे व व्यवस्थापकांसह आमच्या लोकप्रतिनिधींनी बैठक लावावी, ती आवश्यक आहे. आमच्या स्थानकच उत्पन्न खूप चांगल आहे. असे असतानाही सावंतवाडी टर्मिनसकडे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे कोकण रेल्वेसोबत बैठक घेऊन आमच्या मागण्या त्यांच्यासमोर ठेवाव्यात. यासाठी आमदार व खासदारांनी पुढाकार घ्यावा अशी मागणी संघटनेचे सचिव मिहीर मठकर यांनी केली. तसेच कोरोनात काढून घेतलेले थांबे, नव्या लांब पल्ल्याच्या गाड्यांना रेल्वे गाड्यांना थांबे, कोकण रेल्वेचे शिल्पकार प्रा. मधू दंडवते यांच नाव सावंतवाडी टर्मिनसला द्यावे व रखडलेल सावंतवाडी टर्मिनस पूर्णत्वास न्याव अशी विनंती त्यांनी यावेळी केली. स्थानकावर घंटानाद करत कोकण रेल्वे व सरकरला जाग आणली. याप्रसंगी कोकण रेल्वे प्रवासी संघटनेचे अध्यक्ष अँड. संदीप निंबाळकर, सचिव मिहीर मठकर, अँड. नकुल पार्सेकर, माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर, अभिषेक शिंदे, भुषण बांदिवडेकर, सागर तळवणेकर, सागर नाणोसकर, लीलाधर घाडी, नरेंद्र तारी, सुधीर राऊळ, प्रथमेश पाडगांवकर, विनोद नाईक, आदी उपस्थित होते.