तिरोडा ग्रामविकास मुंबईस्थित मंडळांचा रविवारी स्नेहमेळावा !

Edited by: विनायक गांवस
Published on: January 16, 2024 07:18 AM
views 176  views

सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्यातील तिरोडा ग्रामविकास मंडळ, मुंबई आपल्या मुंबईस्थित मुलांच्या मनात जनजागृती करण्यासाठी तसेच सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक दृष्ट्या त्यांच्यातील कलागुणांना वाव देण्यासाठी नेहमीचं हटके कार्यक्रमाचे आयोजन करीत असते. गावातील ग्रामस्थ मंडळी एकत्रित यावेत म्हणून स्नेहमेळावा प्रतिवर्षाप्रमाणे घेतला जातो.  याहीवर्षी रविवार २१ जानेवारी २०२४ रोजी सकाळी १० ते संध्याकाळी ४ यावेळेत रामेश्वर विद्यामंदिर, दत्तमंदिर रोड , वाकोला, सांताक्रूझ (पूर्व) येथे संपन्न होणार आहे. 


या निमित्ताने उद्याचे भविष्य असणाऱ्या विद्यार्थ्यांना फायदेशीर ठरावे या उद्देशाने तिमिरातुनी तेजाकडे या उक्तीप्रमाणे सत्यवान यशवंत रेडकर कनिष्ठ अनुवाद अधिकारी, सीमा शुल्क विभाग मुंबई, भारत सरकार यांचे निःशुल्क शासकीय स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन आयोजित केले आले आहे.  मुंबई आणि उपनगरातील शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षणात  ज्या विद्यार्थ्यांनी प्रगती साधली त्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव खासदार विनायक राऊत, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले आदी प्रमुख पाहुणे यांच्या शुभहस्ते सन्मानित करण्यात येणार आहे. यावेळी स्नेह भोजन व्यवस्था ठेवण्यात आली आहे. तरी मोठ्या संख्येने स्नेहमेळाव्याला उपस्थित राहावे असे तिरोडा ग्रामविकास मंडळाच्यावतीने आवाहन करण्यात आले आहे.