कळसुलकरमध्ये सर्व बॅचच्या माजी विद्यार्थ्यांचे 'गेट टु गेदर'

Edited by: भगवान शेलटे
Published on: December 22, 2023 17:38 PM
views 309  views

सावंतवाडी : कळसुलकर इंग्लिश स्कूल आणि आय.बी.सय्यद कनिष्ठ महाविद्यालयातील आतापर्यंतच्या सर्व बॅचच्या माजी विद्यार्थ्यांचे 'गेट टु गेदर' रविवारी 24 डिसेंबरला सकाळी 10 वाजता शाळेच्या सभागृहात आयोजित केले आहे. स्नेहसंमेलनास सेवानिवृत्त शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी देखील उपस्थित राहातील.  

सकाळी नऊ ते दहा या वाळेत नावनोंदणी आणि चहा, नाष्टा होईल. सकाळी 10 ते 11.30  उद्घाटन समारंभ आणि चर्चासत्र आयोजित केले आहे. चर्चेस 'शाळा काल-आज-उद्या' हा विषय राहिल. त्यानंतर सकाळी साडे अकरा ते एक यावेळेत 'माझी आठवणीतील शाळा' या विषयावर माजी विद्यार्थी - शिक्षक यांची मनोगते होतील. दुपारी एक ते अडीज यावेळेत  स्नेहभोजन, दुपारी अडीज ते पाच 'आठवणीतील खेळ' लंगडी, विटीदांडू, सायकल टायर, लगोरी,काजूंचे खेळ,आबाधुबी इत्यादी होतील. सायंकाळी 5 ते 7 चहापान ,सांस्कृतिक कार्यक्रम व निरोप समारंभ होईल. या कार्यक्रमास सर्व माजी विद्यार्थ्यांनी उपस्थित राहाव असे आवाहन सावंतवाडी एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष शैलेश पई, माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष द. म. गोठोस्कर यांनी केले आहे.