आता सज्ज व्हा, 'कोकणचा महाडान्सर' स्पर्धेसाठी | कोकणचं महाचॅनेल आहे मीडिया पार्टनर !

सोलो आणि जोडी नृत्य स्पर्धेचा समावेश !
Edited by: प्रतिनिधी
Published on: December 22, 2022 12:46 PM
views 190  views

सावंतवाडी : कोकण म्हटलं की समोर येते ते म्हणजे कलावंतांची मांदियाळी ! अर्थातच कोकणच्या सांस्कृतिक इतिहासात डोकावत असताना असे लक्षात येते की, कोकणातील कलावंतांनी आपल्या कलेने जागतिक पातळीवर आपली छाप सोडली आहे. मालवणी नटसम्राट मच्छिंद्र कांबळींनी आपल्या मालवणी भाषेला सातासमुद्रपार नेले. अनेक मराठी, हिंदी चित्रपट व मालिका यांमध्ये कोकणी कलावंतांनी आपल्या कलेचे प्रदर्शन करीत वाहवा मिळवली.

आता कोकणच्या नवोदित कलावंतांना हक्काचे व्यासपीठ मिळवून देण्यासाठी कविलकाटे ग्राम सेवासंघ निर्मित, साई जळवी फिल्म प्रस्तुती पुढे सरसावली आहे. 'कोकणचा महागायक' या कार्यक्रमाला मिळालेल्या उदंड प्रतिसादानंतर साई जळवी फिल्म घेऊन येत आहे, 'कोकणचा महाडान्सर' ही अभिनव स्पर्धा.  यात 'सोलो आणि जोडी नृत्य स्पर्धा' रंगणार आहेत. विशेष म्हणजे कोकणचे नंबर वन महाचॅनेल 'कोकणसाद LIVE' हे स्पर्धेचे मीडिया पार्टनर म्हणून भूमिका बजावण्यासाठी सज्ज झाले आहेत.

 या स्पर्धेसाठी अत्यंत आकर्षक अशी बक्षिसे देखील ठेवण्यात आली आहेत. यात प्रथम क्रमांकासाठी रोख रक्कम २५ हजार रुपये आणि आकर्षक चषक, द्वितीय क्रमांकासाठी रोख रक्कम ११ हजार रुपये आणि आकर्षक चषक, तृतीय क्रमांकासाठी रोख रक्कम ५५५५/ रुपये आणि आकर्षक चषक आणि उत्तेजनार्थसाठी २१११ रुपये आणि आकर्षक चषक सोबतच सहभागी होणाऱ्या प्रत्येक नृत्यांगणांना आकर्षक सन्मानचिन्ह आणि सहभागी प्रमाणपत्र प्रदान करून सन्मानित करण्यात येणार आहे.

 स्पर्धेचे स्थळ श्री सिद्धी गणपती मंदिर, मु. पो. कविलकाटे, ता. कुडाळ, जि. सिंधुदुर्ग असून अधिक माहितीसाठी 8669054396 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन चित्रपट दिग्दर्शक साईनाथ जळवी यांनी केले आहे.