
सावंतवाडी : पालकमंत्री रविंद्र चव्हाण बोलत नाही. मात्र, ते काम करून दाखवतात. त्यांचं आम्हाला नेहमीच सहकार्य राहिलं आहे. गेळे गावाच्या जमिनीचा प्रश्न सुटल्यामुळे आता या गावाच्या विकासात कोणतीही कमतरता भासणार नाही. पर्यटनाच्या माध्यमातून त्या गावाचा सर्वांगीण विकास साधला जाईल. भविष्यात महाराष्ट्राला हेवा वाटेल असं काम गेळे ग्रामपंचायत करून दाखवेल असा विश्वास संदीप गावडे यांनी व्यक्त केला.
गेळे येथील जमीन वाटप कार्यक्रमाच्या आभार प्रदर्शनात ते बोलत होते. गेळे गावचा हा प्रश्न सोडविल्याबद्दल दोन्ही मंत्र्यांचे व प्रशासनाचे विशेष आभार व्यक्त केले.
याप्रसंगी पालकमंत्री रविंद्र चव्हाण, शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर, भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे उपाध्यक्ष युवराज लखमराजे भोंसले, माजी आमदार राजन तेली, माजी नगराध्यक्ष संजू परब, भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अशोक सावंत, माजी नगराध्यक्ष संजू परब , जिल्हा बँक संचालक महेश सारंग, अतिरिक्त जिल्हाधिकारी पद्मश्री बैनाडे, मुख्य कार्यकारी अधिकारी मकरंद देशमुख, प्रांताधिकारी हेमंत निकम, तहसीलदार श्रीधर पाटील, भाजपचे युवा नेते संदीप गावडे, गेळे सरपंच सागर ढोकरे, आंबोली सरपंच सावित्री पालेकर, चौकुळ सरपंच सुरेश शेटये , जि. प .चे माजी उपाध्यक्ष रणजीत देसाई, एकनाथ नाडकर्णी, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अशोक दळवी, तालुकाप्रमुख बबन राणे, वेंगुर्ले तालुकाप्रमुख नितीन मांजरेकर, दिनेश गावडे, माजी नगरसेवक ॲड. परिमल नाईक, भाजपचे बांदा मंडल अध्यक्ष महेश धुरी, सावंतवाडी शहर मंडल अध्यक्ष अजय गोंदावळे, माजी सभापती पंकज पेडणेकर, माजी नगरसेवक तानाजी वाडकर आदी उपस्थित होते.