चाफेडमध्ये गव्या रेड्यांकडून वायंगणी शेतीचे नुकसान !

Edited by: नागेश दुखंडे
Published on: February 13, 2024 08:00 AM
views 194  views

देवगड : देवगड मध्ये पुन्हा चाफेड पिंपळवाडी भागात सध्या गवा रेड्यांचा मुक्तपणे संचार सुरू झाला आहे. या गवा रेड्यांनी येथील अनेक शेतकऱ्यांच्या वायंगणी शेतीत घुसून कुळीथ, चवळी, उडीद, भुईमूग शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे. त्यामुळे शेतकरीवर्ग चिंताग्रस्त झाला आहे.

याबाबत येथील शेतकऱ्यांनी सरपंच किरण मेस्त्री यांना माहिती दिली असता सरपंच आणि पोलीस पाटील संतोष सावंत यांनी तातडीने पिंपळवाडी येथील उंचवळा याठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन नुकसानीचा पंचनामा घातला. यात सुमारे ५० ते ६० हजाराचे नुकसान झाल्याचे नमूद करण्यात आले आहे.

यावेळी सरपंच किरण मेस्त्री, पोलीस पाटील संतोष सावंत, ग्रामपंचायत सदस्य सुदर्शन उर्फ नागेश साळकर, विजय पाटील, प्रदीप घाडी, रमेश राणे, प्रकाश पाटील, प्रशांत साटम, सौ. सुवर्णा पांचाळ, दाजी पाटील, मंगेश साळकर, दीपक राणे, वसंत पांचाळ, तुकाराम घाडी, कुलदीपक घाडीगावकर आदी ग्रामस्थ उपस्थित होते.