
कणकवली : कणकवली व कुडाळ येथे होणारा गौतमी पाटील यांचा डीजे डान्स शो काही तांत्रिक कारणास्तव रद्द करत असल्याचे प्रसिद्धी पत्रक आयोजकांकडून काढण्यात आले. दरम्यान, गौतमी पाटील डीजे शो बाबत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील समाज माध्यमांवर टीकात्मक पोस्ट पडत होत्या. तसेच अन्यही काही संघटनांनी या कार्यक्रमाला विरोध दर्शवला होता. त्यामुळे कदाचित आयोजकांनी हा शो रद्द केल्याची चर्चा सिंधुदुर्गात रंगली आहे.