
रत्नागिरी : जयगड येथील जेएसडब्ल्यू कंपनीतील प्लांटची स्वच्छता करताना त्यातील बाहेर पडलेल्या वाफेमुळे एका शाळेतील 30 ते 35 मुलांना उलटी, मळमळ, डोळ्यातून पाणी येण्याचा त्रास झाला.
गुरुवारी दुपारच्या सुमारास ही घटना घडली असून या प्रकरणाचा तपास आणि चौकशी करू अशी माहिती प्रांताधिकारी जिवन देसाई यांनी दिली. सविस्तर माहिती लवकरच दिली जाईल. नेमके काय झाले याबद्दल अधिकृत माहिती उपलब्ध झालेली नाही. जिल्हा शासकीय रुग्णालयात विद्यार्थ्यांना दाखल केले आहे. रुग्णालयात सर्वपक्षीय पदाधिकारी नागरिक मोठ्या संख्येने दाखल झाले. या प्रकरणामुळे परिसरात भीतीचे वातावरण आहे.