नवरात्रौत्सवानिमित्त महिलांसाठी गरबा आणि खेळ पैठणीचा

शिल्पा, यतीन खोत मित्रमंडळाचे आयोजन
Edited by: कृष्णा ढोलम
Published on: October 03, 2022 20:34 PM
views 226  views

मालवण : नवरात्रौत्सवा निमित्ताने धुरीवाडा येथे सौ. शिल्पा खोत आणि माजी नगरसेवक यतीन खोत मित्रमंडळाच्या वतीने महिलांसाठी गरबा आयोजित करण्यात आला आहे. याचेच औचित्य साधून आज महिलांसाठी “खेळ पैठणीचा” कार्यक्रम मुलांसाठी फनी गेम्स आयोजित करण्यात आले आहेत. याठिकाणी विजेत्यांवर आकर्षक बक्षीसांची उधळण करण्यात येणार आहे. यावेळी राजकीय तसेच समाजिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

महिलांसाठी आज खेळ पैठणीचा आणि लहान मुलांसाठी फनीगेम होणार आहेत. या स्पर्धेतील विजेत्यांना आकर्षक पारितोषिके देण्यात येणार आहेत. तरी नावनोंदणीसाठी सौ. शिल्पा खोत ९३२६४७७७०६ किंवा सौ. सायली कांबळी ९७६४३९७१३९ यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.