कुसूरचे माजी उपसरपंच गणपत साळुंखे यांचं निधन !

Edited by: श्रीधर साळुंखे
Published on: February 18, 2024 14:15 PM
views 129  views

वैभववाडी : कुसूर गावचे उपसरपंच व निवृत्त मुख्याध्यापक गणपत सुर्याजी साळुंखे, वय ८४ यांचं वृद्धापकाळाने शुक्रवारी रात्री निधन झाले. गणपत साळुंखे यांनी गगनबावडा, कणकवली सावंतवाडी, वैभववाडी तालुक्यातील विविध शाळांमध्ये शिक्षक म्हणून काम केले होते.

तसेच त्यांनी २० वर्षे शिक्षक संघाच्या तालुकाध्यक्षपदाचा कारभार यशस्वीपणे सांभाळला. कुसूर गावचे उपसरपंच व पाणलोट समितीचे अध्यक्ष म्हणून त्यांनी काम केले होते. गावातील सामाजिक व धार्मिक कार्यांत ते नेहमीच अग्रेसर असायचे. त्यांच्या पश्चात एक भाऊ, दोन मुलगे, दोन मुली, सुना, जावई, नातवंडे असा परिवार आहे. माजी सभापती अरविंद रावराणे व व्यापारी तिर्थराम चव्हाण यांचे ते सासरे होत.