कोकण मराठी साहित्य परिषदच्या साहित्य संमेलनाध्यक्षपदी गंगाराम गवाणकर

Edited by:
Published on: March 08, 2025 20:14 PM
views 119  views

सावंतवाडी : कोकण मराठी साहित्य परिषद सिंधुदुर्ग शाखा व सावंतवाडी शाखा आयोजित जिल्हास्तरीय साहित्य संमेलन येत्या 22 मार्च रोजी सावंतवाडी येथील बॅरिस्टर नाथ पै. सभागृह येथे होत आहे. या संमेलनाच्या अध्यक्षपदी वस्त्रहरण नाटकाचे लेखक, साहित्यिक प्रा. गंगाराम गवाणकर यांची निवड करण्यात आली आहे. त्यांनी अध्यक्षपद स्वीकारले आहे. 

गवाणकर यांनी मालवणी भाषेत वस्त्रहरण हे नाटक लिहिले आहे. त्यांचा मालवणी भाषेतील मिश्कीलपणा, मालवणी भाषेला राज्य मान्यता मिळवून देण्यात त्यांचा मोठा वाटा आहे. वस्त्रहरण नाटकाचे प्रयोगांचे चार हजार पाचशे प्रयोग करून विश्वविक्रम केला आहे. गाजलेले हे नाटक असून या नाटकाचे लेखक म्हणून त्यांची ओळख आहे. साहित्य क्षेत्रात त्यांचा गाढा अभ्यास आहे. नाशिक येथे झालेल्या 96 व्या नाट्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. त्यांनी आतापर्यंत 20 नाटके लिहिली आहेत. आज नाटक होवचा नाय ही एकांकिका लिहिल्यानंतर त्यांनी मालवणी भाषेत वस्त्रहरण हे नाटक लिहिले. नाट्य लेखक साहित्यिक, जिल्हा साहित्य संमेलनाला अध्यक्ष चे अध्यक्षपदी असणार आहेत. त्यांना राजापूर येथील त्यांच्या निवासस्थानी कोमसाप जिल्हाध्यक्ष मंगेश मस्के, खजिनदार भरत गावडे, कणकवली तालुका अध्यक्ष माधव कदम, ॲड मंदार मस्के, यांनी भेट घेऊन स्वागत केले व संमेलनाचे निमंत्रण दिले आहे. अध्यक्षपद स्वीकारण्याचे श्री. गवाणकर यांनी मान्य केले आहे.