इळये प्राथ.आरोग्य केंद्राबाबत गणेश गावकर यांची वैद्यकीय अधिकारी ग्रामस्थांसमवेत चर्चा

Edited by: नागेश दुखंडे
Published on: October 14, 2023 13:07 PM
views 187  views

देवगड : तालुक्यातील इळये प्राथमिक आरोग्य केंद्रामधील रिक्त पदे व समस्यांबाबत उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे युवासेना देवगड तालुका प्रमुख गणेश गावकर यांनी वैद्यकीय अधिकारी डॉ.मेहुलकुमार जाधव डॉ. साई धुरी यांची भेट ग्रामस्थांसमवेत घेऊन चर्चा केली.

या वेळी त्यांच्या समवेत शिवसेना शाखाप्रमुख अशोक राणे, गणेश वाळके, संतोष दळवी ग्रामस्थ, प्रकाश कदम, रमाकांत कदम, दीपक कदम, सौ.कदम, प्रितेश कदम, चंद्रकांत जाधव, नाना कासले,सदाशिव जाधव व अन्य उपस्थित होते.

या चर्चेत या प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी २ पदे मंजूर असून दोन्ही भरलेली आहेत.आरोग्य सहाय्यक २ पदे (पु ).आरोग्य सहाय्यक (म)१ पद,आरोग्य सेवक (पु )६ पैकी ३ ,कनिष्ठ सहाय्यक १,औषध निर्माण अधिकारी १ पद रिक्त असून ,स्त्री परिचर पद रिक्त, पुरुष परिचर ३ मंजूर असून १ , सफाई कामगार १भरले आहेत, अशी माहिती प्राप्त झाली. तसेच काही प्रमाणात आवश्यक त्या औषध साठा बाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा केली.