
वैभववाडी: वैभववाडी तालुक्यातील कुसूर मळेवाडी येथील रहिवासी गजानन सहदेव साळुंखे (वय ७०) यांचे अल्पशा आजाराने आज (ता. ४) सकाळी ७ वाजता राहत्या घरी निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे आणि एक विवाहित मुलगी असा मोठा परिवार आहे. साळुंखे यांच्या निधनाने कुसूर मळेवाडी गावात शोककळा पसरली आहे. त्यांच्या पार्थिवावर आज दुपारी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.










