लायन्सचे बेस्ट रिजन चेअरमन म्हणून प्लॅटिनम अवाॅर्डने गजानन नाईक सन्मानित

Edited by:
Published on: July 25, 2025 15:03 PM
views 104  views

सावंतवाडी : लायन्स इंटरनॅशनल च्या प्रांत डी १ मध्ये उत्कृष्ट रीजन चेअरमन म्हणून रिजन ५ चे रिजन चेअरमन, ज्येष्ठ पत्रकार ला. गजानन नाईक यांना प्लॅटिनम अवार्ड देऊन सन्मानित करण्यात आले. रिजन ५ मधील रत्नागिरी लायन्स क्लब ने तब्बल वीस अवार्ड प्राप्त करून प्रथम क्रमांक पटकावला. सावंतवाडी लायन्स क्लब ला पाच, मालवण क्लबला दोन, कुडाळ क्लबला तीन, चिपळूण गॅलेक्सी क्लबला 16 अवाॅर्डने प्राप्त झाली. 

लायन्स इंटरनॅशनलच्या प्रांत एक ची अवाॅर्ड नाईट जयघोष नावाने सोलापूर येथे नुकतीच पार पडली. 2024 -25 च्या वर्षात प्रांतात लायनीझममध्ये उत्कृष्ट काम करणाऱ्या क्लबचा आणि पदाधिकाऱ्यांचा अवाॅर्ड देऊन प्रांतपाल ॲड.एम. के. पाटील यांनी सन्मान केला. 

सावंतवाडी लायन्स क्लबचे अध्यक्ष ला. अमेय पै, ला संतोष चोडणकर , ला. महेश पाटील,ॲड. अभिजीत पणदुरकर यांनाही गोल्ड अवाॅर्डने  सन्मानित करण्यात आले .मेंबरशिप ग्रोथ आणि पर्मनंट प्रोजेक्ट यासाठी सावंतवाडी क्लबला अवार्ड मिळाली.

रत्नागिरी लायन्स क्लबने सर्वच क्षेत्रात चांगली कामगिरी करून तब्बल वीस अवाॅर्ड पटकावली क्लबचे अध्यक्ष गणेश धुरी आणि लिओ क्लबचे अध्यक्ष श्रेयस रसाळ यांना बेस्ट प्रेसिडेंट म्हणून प्लॅटिनम अवार्ड ने गौरविण्यात आले. चिपळूण गॅलेक्सी क्लबनेही सोळा अवॉर्ड जिंकून सुयश मिळवले .अध्यक्ष डॉक्टर शमीना परकार यांना बेस्ट प्रेसिडेंटअवाॅर्डने गौरविण्यात आले. झोन चेअरमन डॉक्टर निलेश पाटील यांनाही बेस्ट चेअरमन म्हणून गौरविण्यात आले.