
सावंतवाडी : लायन्स इंटरनॅशनलच्या रिजन चेअरमनपदी सावंतवाडी लायन्स क्लबचे ज्येष्ठ लायन गजानन नाईक यांची डिस्ट्रिक्ट गव्हर्नर एमजेएफ ला एम के पाटील यांनी निवड केली आहे तर रिजन सेक्रेटरी म्हणून लायन अमेय पै यांची निवड झाली आहे .
सावंतवाडी लायन्स क्लब पन्नासाव्या वर्षात पदार्पण करीत असून त्यानिमित्ताने रिजन चेअरमन आणि सेक्रेटरी यांची निवड अभिनंदनीय ठरली आहे. 3234 डी 1या लायन्स क्लबच्या प्रांतात रीजन 5 मध्ये चार झोन असून त्यात 19 क्लब समाविष्ट आहेत.. त्यात रत्नागिरी, चिपळूण, न्यू रत्नागिरी ,खेड ,मंडणगड, सावर्डा , देवरुख, गुहागर, लोटे, दापोली, रॉयल चिपळूण, हातखंबा, खेड, खेड सिटी, मालवण कुडाळ कणकवली सावंतवाडी अशा सुमारे 19 क्लबचा सहभाग आहे.
सावंतवाडी लायन्स क्लब १९७५ साली स्थापन झाला असून सामाजिक बांधिलकीचे विविध उपक्रम राबवून लायन्स क्लबने आम्ही सेवा देतो हे लायन्स क्लबचे ब्रीद वाक्य सार्थ केले आहे .
नवनियुक्त रिजन चेअरमन गजानन नाईक हे व्यवसायाने पत्रकार असून त्यांनी लाईनीझम मध्ये क्लब अध्यक्ष, झोन चेअरमन, डिस्ट्रिक्ट न्यूज लेटर चे संपादक पद अशी पदे भूषवली आहेत. रिजन सेक्रेटरी अमेय पै यांनी सावंतवाडी लायन्स क्लबचे अध्यक्ष, सेक्रेटरी म्हणून यशस्वी काम केले आहे. दोघांच्याही या निवडीबद्दल अभिनंदन करण्यात येतंय.