कुडाळ - मालवणचे भविष्यातील आमदार निलेश राणेच : दत्ता सामंत

Edited by: भरत केसरकर
Published on: July 30, 2023 20:01 PM
views 971  views

कुडाळ : कुडाळ मालवण मधून आमच्या मधून कोणी इच्छुक नाही. त्यामुळे आम्ही स्वतःहून निलेश राणे यांचे नाव सुचवले असून तेच भविष्यातील २०२४ चे भाजपचे कुडाळ मालवणचे उमेदवार असतील असा दावा दत्ता सामंत यांनी केला आहे.

पिंगुळी येथील भाजपच्या कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते. उगाचच आपआपसात भांडत बसू नका. आपल्याला निलेश राणेंना विधानसभेत पोचवायच आहे. यासाठी प्रयत्न करा असे भावनिक आवाहन दत्ता सामंत यांनी आपल्या भाषणात केले.