
वेंगुर्ला : अल्प संख्याक विभाग विकास कार्यक्रम अंतर्गत उभादांडा रोझारीओ चर्च सुशोभिकरणसाठी सावंतवाडी विधानसभा मतदार संघांचे आमदार तथा राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपकभाई केसरकर यांच्या माध्यमातून २७ लाख रुपये मंजूर करण्यात आले असून त्याचे भूमिपूजन जिल्हा नियोजन समिती सदस्य सचिन वालावलकर यांच्या हस्ते आज रविवारी दिनांक ६ ऑक्टोबर रोजी करण्यात आले.
या कामासंदर्भात महाराष्ट्र अल्प संख्याक विकास परिषद सिंधुदुर्ग चे जिल्हा उपाध्यक्ष कार्मिस आल्मेडा यांनी मागणी व पाठपुरावा केल्यानुसार हा निधी मंजूर करण्यात आला. यावेळी निधी साठी पाठपुरावा करणाऱ्या सचिन वालावलकर यांचा ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी शिवसेना जिल्हा संघटक सुनील डुबळे, उपजिल्हाप्रमुख सुनील मोरजकर, उभादांडा सरपंच निलेश चमणकर, उपसरपंच टीना आल्मेडा, कार्मिस आल्मेडा, विभागप्रमुख नयन पेडणेकर, ग्रा.प. सदस्य राधाकृष्ण पेडणेकर, माजी सरपंच इलीयास फर्नांडिस सहअसंख्य क्रिस्ती बांधव उपस्थित होते. यावेळी सचिन वालावलकर यांनी चर्च साठी इन्व्हर्टर देण्यार असल्याचे जाहीर केले. याबाबत सर्वांनी आमदार दीपक केसरकर यांचे आभार मानले.