
सावंतवाडी : सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयाला शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी तातडीने पाच लाख रुपये रुग्ण व रुग्णांच्या नातेवाईकांसाठी व रुग्णालयासाठी साहित्यसामुग्रीसाठी आमदार स्थानिक विकास निधी कार्यक्रमांतर्गत मंजूर केले आले आहेत. यासाठी जीवनरक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजू मसुरकर यांनी लक्ष वेधले होते याबाबत निवेदन देऊन त्यांनी मागणी केली होती.
यासाठी पाठपुरावा करून मोलाचे सहकार्य गजानन नाटेकर यांनी केले. जीवन रक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजू मसुरकर यांनी दीपक केसरकर यांना धन्यवाद देऊन रुग्ण व रुग्णांच्या नातेवाईकांमार्फत आभार मानले आहेत. नुकतेच दिवाळी लक्ष्मीपूजन दिवशी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर सावंतवाडी येथील राजेंद्र प्रभाकर मसूरकर यांच्या सोन्या चांदीच्या दुकानावर (ज्वेलर्स) येथे येऊन दीपावलीच्या शुभेच्छा देण्यासाठी आले होते.
त्यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात असलेल्या रुग्ण व रुग्णांच्या नातेवाईकांना असलेल्या समस्या त्याचप्रमाणे रुग्णालयामध्ये असलेल्या समस्या यांबद्दल सविस्तर चर्चा केली होती याबाबत तातडीने पाच लाख रुपयांची मागणी राजू मसूरकर यांनी केसरकर यांच्याकडे केली होती. राजू मसूरकर यांच्या मागणीनुसार तातडीने आमदार स्थानिक विकास निधी या कार्यक्रमांतर्गत पाच लाख रुपयांची निधी मंजूर करून जिल्हाधिकारी तथा सदस्य सचिव जिल्हा नियोजन समिती जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग जिल्हा यांच्याकडे तातडीने आदेश केसरकर यांच्याकडून देण्यात आले. उपजिल्हा रुग्णालय सावंतवाडी हे १०० खाटांचे ओपीडी ही ३५० ते ४०० असते तसेच आंतर रुग्णसंख्या ही मोठ्याप्रमाणात असते. शहराच्या व येथील वाढत्या रुग्ण संख्येमुळे रुग्ण व रुग्णांचे नातेवाईक यांचेकरीता या रुग्णालयाकरीता खालील साहित्य सामुग्रीमुळे गैरसोय होत होती.